*आपटा पानांचा औषधी उपयोग*
लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् खराब.
ह्या त्रासावर आपट्याच्या पानांचे पाणी उपयोगी आहे. ही पाने फक्त दसर्यालाच मिळतात. ती साठवून ठेवून रोज दोन पाने गरम पाण्यात टाकून गार झाले की थोडेथोडे पिऊन पहावे. पड जीभेला फायदा होतो .
*वेगळ्या पध्दतीने केलेले निरीक्षण*
आपट्याची पाने दसर्यालाच का? फक्त आपटा च का ?
आपले पूर्वज अडाणी नक्कीच नव्हते! कारण काय असावे?
ह्यासाठी एका बॉडी सेंसेटिव्ह असलेल्या मित्रावर प्रयोग केले. ही पाने दुसर्याला देण्याची प्रथा आहे म्हणजे हताळली जातात म्हणजे स्पर्शाला महत्व दिले आहे. म्हणून मित्राला आपट्याचे पान बोटात धरून ठेवायला दिले. व काय वाटते विचारले. दोन मिनीटात त्याने सांगितले स्नायुना एनर्जी मिळते आहे व ऑरा मधे एनर्जी वाढली. ऑरा दाट झाला. पुढील ३०मिनीटात त्याने सांगितले-हार्टचे मसल व घशावर काम करते, ह्या दिवसात (सबंध पावसाळ्याचे दिवसात) कमी झालेली एनर्जी भरून येत आहे असे वाटत आहे.
नंतर त्याला पायाला दुखत होते तिथे आपटा पान ओले करून उलगडून सेलोटेपने लावून ठेवले. तासाभरात त्याने दुखणे कमी झाल्याचे सांगितले.
दोन दिवसानी एका गृहस्थाना खांद्याला दुखत होते तेथे आपटा पान ओले करून सेलोटेपने लावले. व दिवसभर ठेवण्यास सांगितले. दुसरे दिवशी वेदना आता नाहीत असे म्हणाले.
आपट्याचे हे गुण असल्याचे पूर्वजाना माहिती असल्याने समाजाला सांगत बसण्या ऐवजी समाजाचे उपयोगासाठी धंदा न करता आपट्याची पाने देण्याची प्रथा सुरू केली असावी असे मत झाले.
दसर्याचे दुसरे दिवशी ही पाने कचर्यात टाकण्या पेक्षा साठवून ठेऊन वर्षभरात वेदना कमी करण्यासाठी जरूर वापरून पहा.
Comments
Post a Comment