🔱🔱🔱🔱 II *निंदा* II 🔱🔱🔱🔱
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
🌺 *परमार्थात 'निंदा', ही फार घातक ठरते. त्यामुळं अहंकार वाढीस लागतो. म्हणून साधकाने निंदेपासून स्वतःला नेहमीच दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा.*
🌺 *निंदा म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणे, दुसऱ्याला निकृष्ट समजणं. दुसऱ्याला कमी लेखल्यावर साहजिकच आपण मोठं आहोत, हा गोड गैरसमज निर्माण होतो. अहंकार सुखावला जातो आपला.*🌺
🌺 *कळत नकळत...मग बरं वाटतं. अगदी गुदगुल्या होतात मनांत... कारण प्रत्येकाला स्वतःची लायकी, पात्रता माहिती असतेच.. मग दुसरा दुर्जन असल्याशिवाय आपण सज्जन कसं होणार??* 🌺
🌺 *निंदा म्हणजे दुसऱ्याची रेषा छोटी करणं.. मग तुमची रेषा आपोआपच मोठी होते, नाही का? असुरी आनंद होतो मनांत...की चला..*
*कुणीतरी आपल्यापेक्षा ही नालायक, मूर्ख, निकृष्ट आहे या जगात...मी काही एकटाच नाहीय..मी परवडलो एक वेळ...पण हे तर* *आपल्यापेक्षाही जास्त वाईट आहेत...बरं वाटतं, अशा विचाराने. हळूहळू तर असंच वाटायला लागतं की, मी तर चांगलाच माणूस* *आहे...अति शहाण्या माणसांना असंच वाटत असतं नेहमी. अज्ञानी माणसंच शहाणपणाचा दावा करत असतात.* 🌺
🌺 *कुणी जर कुणाची निंदा करत असेल ना, तर आपण त्याचा पुरावा नाही मागत कधी... पण जर स्तुती करत असेल ना, तर लगेच विचारतो...* 🌺
🌺 *कशावरून? उदा-- जर तुमच्या शेजाऱ्याने एकदम भारी कार घेतली आणि तुम्हांला हे कुणी सांगितलं तर, तुम्ही लगेच म्हणता...कशावरून त्याची आहे? बॉस ची असेल त्याच्या..कदाचित हा ड्रायव्हर असेल त्या कार वर.. पण याउलट जर कुणी तुम्हांला सांगितलं की, तो तुमचा शेजारी काल दारू पिऊन पडला होता रस्त्यावर...तर तेंव्हा तुम्ही पुरावा नाही मागत कधी.. तेंव्हा नाही विचारत की, कशावरून हे खरं आहे आहे?? तेंव्हा तुम्ही काय म्हणता...बेवडच आहे ते, पडलं असेल.* 🌺
🌺 *कुणी जर वाईट बोलत असेल कुणाबद्दल तर तुम्ही लगेच मान्य करता, तेंव्हा तुम्हांला पुरावा नाही लागत...आणि चांगलं कुणी सांगितलं तर लगेच कशावरून... पुरावा मागता. हे अतिसूक्ष्म अहंकाराचे लक्षण आहे...एकवेळ पापी माणूस परवडला, पण अहंकारी माणूस हा अत्यंत घातक. पापी असतो. एकवेळ पाप्यांची प्रगती होईल पण अहंकारी व्यक्ती कधीच प्रगती करू शकणार नाही...* 🌺
🌺 *निंदा ऐकण्यात रस वाटू लागला की, समजून जा की ईश्वर दुरावला गेला आहे. तेव्हा, आपण सर्वांनीच या गोष्टीची काळजी घेऊ या...* 🌺
⚜🍄⚜🍄⚜🍄⚜🍄⚜🍄⚜
Comments
Post a Comment