कथा....अरुणाला न्याय हवा
सहा महीन्याच्या बाळाला छातीशी लपेटुन सुनिता भराभर चालु लागली.मागुन काहीजण तिचा पाटलाग करत होते...
सुनिता जरा आंधाराचा फायदा घेत एका घराच्या भींतीआड लपुन बसली.. बाळ नुकतेच आईचे दुध पिऊन झोपी गेले होते म्हणून आवाज नाही केला...पाटलाग करणारे चार जण सरळ रस्त्याला शोधत पुढे निघुन गेले....
बराच वेळ चालुन सुनिता दमली होती. एका बसस्थानकावर ती पोहचली होती.तिथेच एका बसमधे बसली.कसलाही विचार न करता फक्त तिला या गावातुन दूर जायचे होते.त्या बाळाला सुरक्षित ठिकाणी पोहचवायचे होते..
आता बाळाला भुक लागल्याने ते रडु लागले.शेजारी बसलेले आजोबांनी विचारले."काही पाहीजे का बेटा बाळाला मी आणुन देतो".
"अंधार झालाय बाहेर म्हणून विचारले.बस निघेल दहा मिनिटांत मग घेता येणार नाही काही "...!
हो बाबा, दुध घ्यावे लागेल बाळाला.मी आणते पटकन समोरच्या चहाच्या टपरीहुन तुम्ही बाळाला सांभाळा...
हो दे माझ्याकडे माझेही गुढघे थकलेय जरा.
तुच घेऊन ये पटकन..
सुनिता पटकन चहाटपरीवर गेली आणि बाळासाठी दुधाची मागणी केली...
चहा टपरीवाला दादा म्हणाला..ताई काही आणलेय का घ्यायला बाळाची दुधबाटली वगैरे...
नाही हो दादा..असं करा, एक पानी बाँटल द्या मलाही तहान लागलीय...मग तिच्यातच जरा कोमट करुन द्या दुध..
घ्यायला बाँटल नव्हती मग एक बीसलरी घेऊन सुनिताने तहान भागवली.आणि त्याच बाटलीत कोमट दुध भरुन घेतले..
किती पैसे झाले दादा..मँडम तीस रुपये..
बर हे घ्या ...धन्यवाद
चालताना मनाशीच पुटपुटली ..."बरे झाले निघताना पैसे स्वतःजवळ घेतले होते.तसे अरुणानेच सुचविले होते त्या ड्रावरमधुन पैसे घे सुनिता आणि पळ बाळाला घेवुन पटकन... अंतिम क्षणातही तिचे आईचे हृदय काळजी करत होते "...!
बस निघण्याच्या तयारीत होती.आजोबांनी आवाज दिला..
"लवकर चल बाळा ,बस निघेन आता".
सुनिता पटकन चढली.जागेवर बसली.
आजोबांच्या हातात बाळ खेळत होते त्यांच्या आठच्या आकाराच्या काठीशी..
दुध कोमट करुन घेतले बाळाला म्हणून वेळ झाला बाबा.तुमची आभारी आहे वेळेवर मदत झाली मला.
अरे असे नाही .मोठी माणसे असतातच लहानांची काळजी घ्यायला....
आणि लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलंच असतात..या निरागस बालकांना आपणच जपायचे असते.संस्कारांनी वाढवायचे असते.
सुनिताचे डोळे भरुन आले.तिने कळु न देता.बाळाला द्या म्हणाली..
बाबा मी दुध देते बाळाला.तिने बाटलीच्या बुचाच्या सहाय्याने घोट घोट दुध बाळाला पाजले..
पोट भरताच बाळ खेळु लागले.हसु लागले.सुनिताचा चांगलाच लळा लागला होता त्या चिमुरड्याला.
बस चालु झाली.तिकीट काढले गेले. कनडंक्टर जवळ येताच सुनिता म्हणाली ,एक नागपुर द्या..तिकिट घेऊन ती बाळाला खिडकीतून लाईटांचा प्रकाश दाखवत खेळवत राहीली.
" मुली ,काय नाव ठेवले बाळाचे ".
"अनिकेत नाव आहे आजोबा त्याचे".
बर बर छान आहे नाव..कुठे रहाते तु.
मी नागपुरला रहाते ईकडे भावाकडे आले होते.
मनातुन घाबरली .कुणाला काय सांगणार खरी परीस्थिती...
आपण शांत बसलेलेच बरे...असे म्हणत सुनिता बाळाकडे पहात विचारमग्न झाली....
बस सुरु होताच गार हवेच्या झुळकांनी बाळ पुन्हा झोपी गेले...आणि खिडकीबाहेर पहात सुनिता शुन्यात विचारमग्न होऊन नुकत्याच घडलेल्या भुतकाळात गेली...
किती छान होता अरुणा राँकेशचा संसार हे पिलु..मला तर जणु लेकच भेटली होती तिच्यात...या चाळीशीत मीही काम करुन पोट भरत होते..पण या जोडप्याचा खुपच लळा लागला आणि त्यांचाही केव्हढा विश्वास माझ्यावर...
प्रेम केले घरच्यांचा विरोधात लग्न करुन सुखी संसार करत होते..पण किती पशुता मानवात संपवले बिचारीला....या बाळाला आईविना पोरके केले...कुणाचा दोष यात आणि काय ...प्रेम करणे मृत्यूला ओढवणे झाले...काय झाले असेल माघारी...मी तर बाळाचा जीव वाचवत त्या नराधमापासुन निसटले पण अरुणाचे काय झाले असेल कळत नाही ...
विचारांच्या कल्लोळात सुनिताही डोळा लागला...
ईकडे रक्ताच्या थारोळ्यात अरुणा शेवटची घटका मोजत असते.बाळ सुखरुप असावं म्हणुन सुनिताच्या विनवण्या करते.ती घरातुन जाताच बाबांना जखमी अवस्थेत फोन करते.
"हँलो बाबा, बाबा मी अरुणा "
"ठेव फोन कारटे मला नाही बोलायचे तुझ्याशी .तु ज्या दिवशी प्रेमविवाह करुन पळुन गेली, तु आमच्या नावाला काळीमा फासलास त्याच दिवशी तु मेली आम्हाला"...
खरच मी मरतेय बाबा ,शेवटच्या श्वास घेतेय म्हणून आईबाबांची माफी मागायला फोन लावलाय...आईं....गं....आ..आ..आ...
(अरुणाचे बाबा)...
काय झालंय अरुणा अशी का विव्हळतेय...?
(अरुणाचीआई)
अहो अरुणाचा फोन मला द्या हो लेकीशी बोलु द्या जरा...
अगं घे घे पण..पण तीला काहीतरी झालेय गं
(घाबरता दोघेही आईबाबा)...
आई आई..माझ्या बाळाला सांभाळा हं सुनिताकडे सोपवलेय मी माझी कामवाली ...
अगं पण काय झाले बोल तरी ..
एवढा वेळ नाही माझ्याकडे आई ...संपलेय सारेच ...
अरे माझ्या कर्मा...काय झालं कळत नाही अशी का बोलतेय गं सोन्या..
आईच्या हातातुन फोन निसटतो.... बाबा फोन हातात घेता, हँलो बोल अरुणा..
"बाबा माझ्यावर हल्ला झालाय चाकूचे वार झालेय.राकेश अमेरीकेत गेलाय चार महीने ...हा डाव साधुन सासरच्यांनी कट रचला मला बाळाला संपवण्याचा"....
प्रेमविवाह नडला सर्वांनाच...
मी काय गुन्हा केला बाबा, अशी शिक्षा का द्यावी मला ."प्रेमच केले होते ना माणसावरच"...असा जीव घ्यायचा अधिकार कुणी दिला मानवाला...बाबा सांगाना..मी गेल्यावर मला न्याय मिळवुन द्या बाबा...आss आss आ ss....आई गं...
हँलो हँलो अरुणा अरुणा माझी अरु बोल ना गं ...ss
आम्ही ...आम्ही तुला माफ केलय बेटा, पण जगाच्या भीतीने आम्ही गंप्प होतो गं पोरी, अशी जाऊ नकोस आम्हाला सोडुन..
अरुणा विव्हळतच बोलते ..माफ ...माफ केलय ना मला बाबा आता मी सुखाने जा..जा...जा...ईन.....!!
आम्ही येतो तिकडे लगेच..घाबरु नको अरु
अरु...अरु...आमची अरु काय झालय बाळा बोलना बोलना...आआआआsssss
फोनवर आरुणाचा संवाद थांबतो ...बराच वेळ स्तब्धता रडुन लालबुंद झालेले आईबाबा ..मीस्टर केशव वर्मा आणि शांती लेकीला भेटायला निघतात..
आधी पोलिस स्टेशनला कंप्लेट देतात...
या बसा...साहेब आमच्या मुलीचा शेवटचा फोन आला.आसे असे घडले आम्ही तिकडेच जातोय पण आधी कंप्लेट नोंदवा..
पोलीस... हो हो बोला...
(केशव वर्मा)
आमची मुलगी आणि राकेश चव्हाण यांचा प्रेमविवाह झाला.सर्वाचा विरोध होता..पण काही काळाने विसरले सारे..त्यांच्याशी मात्र संबंध तोडले आम्ही..समाजाच्या ईज्जतीच्या नवाने..
आज अचानक तिचा शेवटचा हुंदकाच कानी आला तिचा खुन झालाय..तिने स्वतः सांगितले अत्यावस्थ अवस्थेतही...आणि अखेरचा श्वास घेतला हो..आमच्या पोरीने..
पोलिस...शांत व्हा शांत व्हा..चला जाऊया बरोबरच तिकडे.
लेडीज काँन्सेटबल चला तुम्ही ही या शांतीताईंना सावरा...
ईकडे सर्व घराभोवती गर्दी दाटलेली असते..
पोलिस विचारतात कुणी पाहीले प्रथम.
(शेजारची विमल पुढे येते)..
दरवाजा उघडा असतो म्हणून मी अरुणाला आवाज दिला. बाळही दिसेना म्हणून आत गेले तर ती रक्ताच्या थारोळ्यात पाहुन ओरडले.आणि सर्व जमा झाले.तेवढ्यात तुम्ही आले..
हे केव्हा कसे झाले काहीच कळले नाही ..
पोलिस पंचनामा करतात.अरुणाची अवस्था पाहुन शांतीला चक्कर येतात..केशावजी जागीच बसतात..
पोलिस अधिकारी रंजन शाब्दिक आधार देतो...सावरा स्वतःला आणि जावयाला कळवा झाला प्रकार..
राकेशला फोन करुन कळवतात तो भयंकर संतापतो त्याच्या घरच्यावर...आणि उद्ध्वस्त होतो मनातुन अरुणाची एक्झिट ऐकुन...कंपनीकडुन त्याची
तातडिने येण्याची व्यवस्था केली जाते...
रात्रीचा प्रवास संपुन सुनिता नागपुरला उतरते...तिथे रहाणारी तिची एक मावसबहीणीकडे जाते....
दार वाजवते ..,अगं सुनिता आचानक आणि हे बाळ कुणाचे?
घरात तर येऊदे भारती सांगते सर्व...
ये ये आत ये..मी पाणी आणते.
पाण्याचे घोट घेत सुनिता म्हणते..भारती काही दिवस मी रहायला आलेय ..एक संकटात सापडलेय...
आगं हो ते दिसतय तुझ्या चेहऱ्यावर ..बस मी चहा करते निवांत बोलु आपण..
हो हो म्हणत बाळाला भारतीची चार वर्षाची मुलगी जवळ घेते.ते आता चोळमटुन लाल झालेले असते..रडुही लागते..
भारती थोडं दुधही गरम कर गं बाळाला..
हो हो आणते ताई...
बाळाला चमच्याने दुध पाजुन दोघीही चहा पितात.आणि सुनिता सारा प्रकार कथन करते...
दोघीही चिंताग्रस्त होतात.भारती अगं राकेश साहेब आले भारतात की अनिकेत त्यांच्या ताब्यात देवुन मी निवांत होईन जबाबदारीतुन अरुणामँडमने सोपवलेल्या...
तोपर्यत मी रहाते तुझ्याकडे दाजी रागवणार नाही ना...
नाही गं तु किती मोठे माणुसकीचे काम करतेय त्यात आमचाही हातभार लागला तर आमचे भाग्यच आहे ना..
आता तु फ्रेश हो थकलीय खुप ..
हो..हो खरंच गं आवरते मी..आनिकेत खेळा हं दिदिबरोबर आपण गावाला आलोय..बाबा आले की तु जाऊ बाबाकडे आपण..
हसत हसत सुनिता शांत होते समाधानाने..
ईकडे केशवजी अरुणाचा देह ताब्यात घेवुन अंतिमसंस्कार करतात..सारे भयानक,विदारक प्रसंग असतात...
दोन दिवसाने राँकेश परत येतो.थेट पोलिस स्टेशन गाठतो..
लागला का तपास गुन्हेगारांचा सर..
हो लागलाय चार जणांनी अरुणाला मारण्याची सुपारी घेतली होती.दोघे सापडले अजुन दोघांचा शोध चालु आहे ..
काळजी करु नका..बाळ तुमच्या कामवाल्या बाईकडे सुरक्षित आहे ते तुमच्याच ताब्यात देणार असे म्हणाली ती.आम्ही फोन केला होता..
हो मी तिकडेच जाणार आहे आता आधी अरुणाच्या आईबाबाकडे जातो..बाकी तपास लवकर करा माझ्या अरुणाचे खुनी सुटता कामा नये...
राकेश अरुणाच्या घरी येताच आई हंबरडा फोडतात.माझी अरुणा वापस कर राकेश तु सांभाळू नाही शकला..
राकेशने दाबुन ठेवलेला हुंदका या आईबाबापुढे मोकळा होतो...काही वेळानंतर सारे शांत होतात..शुन्य झालेय जणु त्यांचे जग..
राकेशला केशवजी फ्रेश व्हायला सांगतात.अनिकेत बाळाला घेवुन येवु आपण आजच ...असे सांगताच राकेश जड पावलाने उठतो..
शांती जेवन बनवुन त्यांना बळजबरीने खायला सांगते..आता पुढचे पाऊल टाकावेच लागणार ...अनिकेतसाठी खंबीर व्हायला हवे सर्वांनीच असे सांगत ती मात्र मनातुन खचुन जाते मुलीच्या विरहाने....
सासरेजावई दोघे नागपुरला पोहचतात.सुनिताला फोनवर कळवले असते.अनिकेत बापाच्या ताब्यात देवुन सुनिता जबाबदारीतुन मुक्त होते..भारतीच्या मदतीचा डोळ्यांत मायेच्या अश्रुंनी निरोप घेवुन सर्व परत येतात सुनितासह ..अनिकेतला सांभाळायला तिचाच लळा असतो बाळाला...
पोलिस यंत्रणा आरोपींना पकडते.राकेशच्या घरच्यांचाच यात हात असतो त्यांना अटक होते.काही जामिनावर सुटतात.केस कोर्टात सुरु होते .
केशवराव ,शांतीजी कोर्टाच्या फेऱ्या मारत रहातात अरुणाला न्याय मिळावा यासाठी.
राकेश ,सुनिताच्या मदतीने अनिकेतला वाढवत असतात.
दोन वर्षाने केशवजी त्यांची नात्यातली पुजाशी लग्नासाठी राकेशला विनंती करतात.
अनिकेतसाठी लग्न करण्यास आग्रह धरतात.राकेशला आता हेच आईबाबा वाटतात.
त्यांचा मान ठेवुन अनिकेतला नवी आई घरात येते.जी छान सांभाळते अनिकेतची आई होऊन ..अरुणाचा तुटलेला संसार विनत पुन्हा घराला घरपण आणते..
केशवजी आणि शांतीजी अनेक वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवत रहातात प्रेमाच्या गुन्ह्यासाठी .....न्यायाच्या प्रतिक्षेत....!!
समाप्त
©सौ.सविता दरेकर
चांदवड,नाशिक
mo,9403498583
Comments
Post a Comment