Skip to main content

जिवन जगताना


"उपवास करून जर
देव खूश होत असेल
तर या जगात कित्येक
दिवस उपाशी पोटी
असणारा भिखारी हा
सर्वात जास्त सुखी राहिला
असता.

‬देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....
👉आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि
👉स्वतःला लाथही मारू शकत नाही.
म्हणूनच.. माणसाच्या जीवनात
"हितचिंतकांची"आणि
"निंदकांची" आवश्यकता आहे....

आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन् वेळेला तुमचा आरसा बनतील,........

कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

🐾पूजा करायच्या आधी …….❕
👍विश्वास ठेवायला शिका.....❗
👄बोलायच्या आधी….❕
👂ऐकायला शिका............❗
🎁खर्च करायच्या आधी….❕
💰कमवायला शिका.......❗
📝लिहायच्या आधी ……❕
😇विचार करायला शिका......❗
हार मानण्याआधी.....❕
👏प्रयत्न करायला शिका
आणि मरायच्या आधी .....❗
जगायला शिका......❕

👉जीवनात एवढ्याहि चुका करू नका,
कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.

🌞 जिवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....
    
आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच
घमेंड करू नये,
कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात
त्या नक्कीच संपत असतात ...

*" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"*

1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
2:-"समाज" स्मशाना पर्यंत
3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत

      फक्त आणी फक्त 
              "कर्म"
        मोक्षl पर्यंत

जिच्या उदरात जन्म होतो ती माता,
आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती.
यातील वेलांटीचा फरक

* नक्की वाचा *

*जन्म* : दूसर्याने दिला ...
*नाव* : दूसर्या ने ठेवलं ...
*शिक्षण* : दूसर्याने दिलं ...
*रोजगार* : दूसर्याने दिला ...
*इज़्ज़त* : दूसर्यांनी दिली ...
*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* :
दुसरेच घालणार ...
*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...
*आणि स्मशानभूमीत* : दूसरेच घेऊन जाणार...

तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!
*दु:ख* इतकं नशीबवान आहे की
ज्याला प्राप्त करून लोक...
आपल्या माणसांना *आठवतात*.

*धन* इतकं दुर्दैवी आहे की
ज्याला मिळवून लोक नेहमी...
आपल्या माणसांना *विसरतात*.

किती अजब आहे ना...??

माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे,
पण जखम झाली की रक्त येतं....

आणि
माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून
हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.                          

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

#हृदयस्पर्शी किस्सा "

रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण -- *एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* - "नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढ...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...