कपडे ....
लेखाचं नाव वाचुनच प्रश्न पडला असेल ना ? कपडे .. हा काय विषय आहे लिखानाचा ? असुन असुन काय असेल यात ? समाजात वावरताना अनेक रंगांचे , ढंगांचे कपडे पहायला मिळतात . अंगभर घातलेले , तोकडे .. पण माणसाच्या अंगावर दिसतातच कपडे . खरंतर पृथ्वीवर अनेक सजीव राहतात . पण यातला माणूसच कपडे घालतो . बाकीचे सगळे सजीव अगदी नग्न असतात . मग माणसालाच कपड्यांची आवश्यकता का वाटते ?
माणूस सोडुन इतर सजीवात अश्लीलता , विनयभंग , वाईट नजरा , बलात्कार अशा गोष्टी पहायला मिळतात का ? आपलं अंग झाकावं असं का नाही वाटत त्यांना ? का त्यांना तशी गरज वाटत नाही ? कारण आहे संस्कृती ! त्यांच्यात संस्कृती नसते , जगण्याचे नियम नसतात . जसं आहे तसं जगायचं एवढंच माहीत असतं मानवेतर सजीवांना . कमावने , साठवणे याची गरजच पडत नाही त्यांना . त्यामुळे वाईट नजरा , बलात्कार अश्लीलता , विनयभंग हे त्यांच्या जगण्याचा भाग नसतंच !
पण माणसाचं बरोबर या उलट आहे . अंग तर झाकलेलं असतं .. पण झाकलेल्या अंगातलं सुद्धा माणुस बघत असतो . अंग झाकणे ही संस्कृती .. मग झाकलेल्यात सुद्धा वाईट नजरेनं बघणे याला काय म्हणावं ? अश्लीलता , वाईट नजरा , बलात्कार घडु नयेत म्हणूनच कपड्यात अंग झाकलं जात असेल ना ? मग असे घृणास्पद प्रकार का घडतात ?
खरंतर आदीमानव हा प्राणी , पक्षां सारखाच नग्न होता . पण तेव्हा असे प्रकार नव्हते . जसजसा माणुस मेंदुचा वापर करु लागला तसतशा नवनवीन कल्पना साकारु लागला . बाकीचे सजीव जसे होते तसेच आजही आहेत . सुख , दु:खाशी त्यांचा संबंध नसतो . फक्त मरे पर्यंत जगायचं एवढंच त्यांना माहीत असतं . माणुस मात्र नव नवीन शोधत गेला .. आणि समस्यांनी ग्रासु लागला . जंगलातल्या पशु पक्षांना दवाखान्याची गरज असते का ? माणूस मात्र गंभीर आजार जवळ करुन बसला . आज तर दवाखान्या शिवाय , औषधा शिवाय माणुस जगुच शकत नाही .
हे झालं शारीरीक आजाराचं . पण माणसाला मानसीक आजारांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागण झाली . कृत्रीम जगण्यानं माणुस नैसर्गीक स्वभावा पासुन दुर जावु लागला . लैंगीकता हा मानसीक आजार फक्त माणसातच बोकाळला . एवढा की तो कधीही बरा न होणारा आजार झाला . इतर प्राणीमात्र मात्र या आजारापासुन बचावले . कारण त्यांनी आपलं काहीच झाकलं नाही . माणसाला डोळ्यांनी दिसणारं निसर्गाचं नागडं , सुंदर रुप बघण्यात स्वारस्य राहीलं नाही . कपड्याच्या आत झाकलेलं बघण्याचा विकार मात्र जडला . आणि या आजारानं एवढं गंभीर रुप धारण केलं .. बलात्कार , विनयभंग , व्यभीचार हे त्या आजाराचे साईड इफेक्ट सुद्धा त्याला चिकटले .
मित्रानो ' कपडे ' या विषयावर म्हणूनच मला लिहावं वाटलं . कारण कपड्यात झाकलेला माणुस वास्तवात मात्र नागडा झाला . जेवढे चांगले कपडे .. तेवढा त्या कपड्यात डोकावु लागला . वासनांध झाला ! एवढा वासनांध झाला .. सुरक्षीततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला . दोन चार वर्षाच्या बालीका सुद्धा त्याच्या नजरेची , काम वासनेची शिकार होवु लागल्या . बलात्काराच्या बातमीनं वर्तमानपत्रात अग्र स्थान मिळवलं . विखार नावाच्या व्हायरसचं व्हायरल इन्फेक्शन झपाट्यानं पसरलं . जे झाकलं जातं त्याचं आकर्षण जास्तच निर्माण होतं . म्हणूनच एक विचार मनाला स्पर्शुन गेला ... प्राणी मात्रांसारखा माणुस कपड्या विना राहीला असता तर कदाचीत या गंभीर समस्यांपासुन वाचला असता . कदाचीत हा विखारी व्हायरस निर्माणच झाला नसता .
विनायक देशमुख
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment