Skip to main content

'जिंदादिली'

दीड दिवसाच्या फाजिल चर्चे नंतर, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिनीला हातात-हात नाहीतर कोपरखैरने स्टेशन बाहेरच्या चित्रपटगृहात गळ्यात-गळा घालुन बसणारे आत्ता यालाच प्रेम समजु लागलेत...

बापाच्या जिवावर गाड्या फिरवत, सकाळी-सकाळी कॉलेज भोवती फेरफटका मारने, गरज नसताना आपल्या हुशारीचा दिखाऊपना करणे, महागड़े कपड़े, गळ्यात चैनी, कानात इंग्लिश गाणी हीच काय ती प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत आसा गैरसमज हल्ली काहीजन करून बसलेत...

शुल्लक कारणावरून झालेल्या वादाला ब्रेकअप च नाव देऊन जुन्या चेहऱ्याला पर्याय शोधत, नवीन काहीतरी शोधायची चंचल वृत्ती मात्र बळावली आणि काहीजण यालाच आपली छावेगिरी मानण्यात धन्यत्ता मानु लागलेत...

या अशा अनेक गोष्टी, ज्यात सगळ आहे पण उणीव राहिली ती जिंदादिलीची, इछ्या पुर्ण व्हायला लागल्या मात्र भटकत राहिला तो शोध, भटकत राहिली ती सर्वस्व बहाल करण्याची वृत्ती, मिठुन गेले सजीव हृदयाचे दरवाजे, आपल कोण आणि परक कोण यातला फरकच यामुळे कळेणासा झाला...

ही जिंदादिली अशी ईनॉर्बिट मॉल मधे, २३ च्या गार्डनमधे, म्याकडीच्या बर्गर मधे, २२० सी.सी. च्या गाडीमधे, रे बॅन च्या गॉगल मधे, फासट्रयाक च्या घडयाळयामधे आणि पन्नास हजारांच्या मोबाइल स्क्रीन मधे शोधुन कशी सापडेल त्यासाठी लागणारा विश्वास आणि जिव लावण्याची कला आपल्याकडे हवी ती उसणी घेता येत नाही...

दोन व्यक्ती असल्या की प्रेम करता येत हे साफ चुकीच  आहे प्रेमासाठी या सोबत लागते ती 'जिंदादिली'. जी हल्ली खुप दुर्मिळ झाली आहे.

#दुनियादारी

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

#हृदयस्पर्शी किस्सा "

रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण -- *एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* - "नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढ...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...