●अतिमहत्वांचे सुचलं.. लगेच लिहिले..थोडं थाबा..वाचा अन विचार करा..●
●एक पीढी जी १९८० च्या अगोदरची व दुसरी पीढी जी १९८० च्या नंतरची...मग यात काय विषेश?
●हो..तेच सांगणार आहे..माहीत आहे.. सध्याच्या पीढीला कळतय पण वळत नाही इतकेच..
●पुर्वी ची पीढी शिस्तीत जगली..मनोरंजनाचे मर्यादीत साधने असल्याने तिकडे लक्ष कमी असायचे..पण सकाळी पहाटे लवकर उठणे,व्यायाम करणे, सकाळचे सर्व विधी सुर्योदयापुर्वीच आटोपणे,लवकर तयार होवून शाळेत अथवा कामावर जाणे,फक्त घरातून दिलेला डबा खाणे,बाहेरचे अन्नपदार्थ आवडत असले तरी ते घेण्यास पैसे नसणे किंवा घरातील व्यक्तींनी आपण आजारी पडू म्हणून दम दिलेला असायचा त्यामुळे इच्छा असूनही दुर्लक्ष करणे,पुर्वी वीज नसल्याने जर शेतकरी व कामगार असेल तर सकाळी जेवण पण लवकर ९ वाजताच करायचे अन दुपारी पण अगदी कमी किंवा नाहीच अन संध्याकाळी ६ वाजताच जेवण उरकून घ्यायचेत. जरी वीज नव्हती पण शरीर शास्र आपोआपच पाळले जायचे ..शिवाय घरी खारीक ,खोबरे,शेंगदाणे अथवा गुळ वगैरे यासाठी खायला मनाई नव्हती व पचन पण होत होते ..तसेच पुर्वी वाहने कमी होते त्यामुळे बरेच लोक पायी अथवा सायकल किंवा टांगे,छकडे,घोडे वगैरे ने प्रवास करत.. तसेच रात्री ८ वाजताच झोपी जात ..व पहाटेच लवकर ४ किंवा ५ वाजताच उठून रोजचा दिनक्रम सुरू व्हायचा..म्हणजे आपल्या शरीरात जे शरीर चक्र आहेत(हे मी वाचलेलं आहे,मी डाॅक्टर नाही पण इंजिनीयर आहे) ..जे २४ तास कार्यरत असते ..जसे की {१}पहाटे २वा.ते सकाळी ६वा.= वात,{२}सकाळी ६ वा.ते सकाळी १० वा.=कफ,{३} सकाळी १० वा. ते दुपारी २ वा.=पीत्त, पुन्हा {४} दुपारी २ वा.ते सायंकाळी ६ वा.=वात,{५} सायंकाळी ६ वा.ते रात्री १० वा.=कफ,{६}रात्री १० वा.ते पहाटे २ वा.=पीत्त अशा प्रकारे सुरू असते...ह्या प्रकारे बाकीच्या प्रदेशात पण थोड्याफार फरकाने असेच असेल...
●आता बघा ..पुर्वी लोक पहाटे बरोबर ४ ला उठायचे म्हणजे रात्री २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत जेव्हा शरीरात वात प्रभावी असतो तेव्हा सर्व विधी होवून जायचे त्यामुळे मुळव्याध किंवा अपचन वगैरे होत नव्हते..तसेच ते सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान जेव्हा कफ काळ असेल तेव्हा एकतर (शेतकरी लोक) जेवण किंवा न्याहरी असे करायचे ..अन दुपारी १२वा पीत्त प्रभावामधे(नोकर वर्ग) जेवण करायचे अन सायं काळी पुन्हा ६ वा जेवण उरकून घ्यायचे कफ काळ असायचा...म्हणजे ते लोक कफ किंवा पीत्त प्रभावी (म्हणजे" त्या त्या" काळाचा मध्य काळ) काळामधे जेवण करायचे व वात मधे काहीच खायचे नाही. कारण वात मधे शरीर शुद्धीकरण सुरू असते ...शिवाय जवणात सर्व भाज्या गावरान व बाजरी अथवा ज्वारी,नाचणी किंवा मिक्स धान्याची भाकरी असायची .. पुर्वी साखर वापरत नसे फक्त गुळ वापरायचा त्यामुळे डायबेटीस प्रकार नव्हता ...मिरची नाही तर मीरी वापरायचे अन घरचाच मसाला असे त्यामुळे मुळव्याध नसायचा..कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू नव्हत्या तर सर्व कामे हाताने करावी लागत त्यामुळे बैठी जीवनशैली नसायची..त्यामुळे व्यायाम पण व्हायचा अन गावरान धान्य व भाजी खात असत की ज्यावर काही किटकनाशक फवारलेले नसे त्यामुळे ते निरोगी असे ...अन पुर्वी सायंकाळचे जेवण ते सकाळचे जेवण यात १५ तासाचे अंतर होत असे त्यामुळे आपोआपच शरीराला आराम व उपास होत असे की जेणेकरून आपले यकृत (pancreas)उलट व सुलट दोन्ही प्रकारे कार्य करत असे ...तुम्हाला माहित नाही की आपल्या शरीरात अशी यंत्रणा आहे की आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी (१२५च्या वर गेलली ) यकृताकडून नियंत्रीत केली जाते तसेच जेव्हा आपल्या जेवणातील अंतर वाढते..उदा. रात्री झोपेतून उठलो की सकाळी ९ वाजेपर्यंत सुमारे १५ ते १६ तास होतात..त्यामुळे उपास काळ ८ तासापेक्षा जास्त वाढल्याने तेव्हा यकृत पुन्हा शरीरातील फॅट मधील साखर शोषून ती रक्तात (८०च्या खाली गेलेली )साखर पुन्हा वाढवत असे जेणेकरून नियंत्रकाचे काम करत असे म्हणजे आपण एकदा जेवल की त्याप्रमाणे यकृत दोन्ही प्रकारे कार्य करते. हे आपल्याला माहिती नाही...
●पण आताचे लोक आपण सकाळी पुन्हा पूर्ण व खूप नाश्ता करत असल्याने व दुपारी पण पूर्ण व खूप जेवण करतत व सायंकाळी खूप उशीरा रात्री १० पर्यंत खूप पुर्ण जेवण करतत त्यामुळे आपल पचन नीट होत नाही व सकाळी आपण नाश्त्याची सवय लावून घेतल्याने यकृताला उलट काम करायला लावत नसल्याने ती सवय बदलून गेली व शरीरशास्र व आहारशास्त्र बदलल्यामुळे आता डायबीटीस प्रमाण वाढले आहे कारण यकृत सारखे साखर नियंत्रीत करण्यासाठी सारखे इन्सुलिन निर्माण करत आहे... व त्याला उलट कार्य करायला आपण वेळच देत नाही तर नेमके सकाळीच नाश्ताच्या वेळेला नाश्ता केल्याने पुन्हा इन्सुलिन निर्माण सुरू होते...असे सारखे झाल्याने आपले शरीर इन्सुलिनला पण कालांतराने दाद देत नाही कारण इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलाय त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढत चालले आहे म्हणूनच सर्व घोळ झालाय..
●सुश्रुत किंवा वागभट्ट यांना थोडेच तेव्हा पुर्वी माहीत होते की पुढे जावून लोक इतके बिघडणार आहेत...
सकाळी राजकुमार सारखे खावे ,दुपारी राजासारखे खावे व रात्री भिकारी सारखे खावे...हे सर्व खरे आहे त्याचा अर्थ असा की सकाळी उच्च प्रतिचे म्हणजे ड्राय फ्रूट वगैरे खावे..दुपारी साधारण खावे व रात्री दुपारचे उरलेले अथवा हलके फुलके ,सुप वगैरे खावे किंवा प्यावे. की जेणेकरून पोट हलके राहील व पचन लवकर होईल...पण आपण असे करत नाही. आपण याच्या नेमके उलट करतोय.
●पण...आपण लोकांनी त्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ घेतला व आपण तिन्ही वेळा स्वतःला राजकुमार समजतो व भरपेट जेवतो ,हादडतो..तर मग कशाला शरीरशास्र काम करेल....त्यामुळे आपले सर्व तंत्र आता बिघडले आहे...
●आता तर नविन पीढीबद्दल तर बोलायलाच नको..
मी वर वर्णन केल्याप्रमाणे एकही नियम पाळला जात नाही.त्यामुळे अपचन,मुळव्याध,ह्रदयरोग,श्वसनरोग,
दमा,डोकेदुखी, केस गळणे व न्युरोसमस्या, जन्म दोष वगैरे रोग लवकर व जास्त होताय.. पुर्वी लोक १००वर्ष जगत ..आता ५० वर्ष पर्यंतच जगताय..याला कारण आपली बदललेली जीवनशैली व खालावलेली अन्न धान्याची प्रत व त्यावर फवारलेले विषारी कीटकनाशके...हे होय..
●आता अशामुळे..काय होतय?..
आता गावरान अन्न धान्य नसल्यामुळे व हायब्रीड, कीटकनाशक फवारलेले असल्याने ...स्री व पुरूषामधे कमजोरी व हार्मोनल चेंजमुळे...शरीरशास्र बिघडले आहे...आता कमजोरी मुळे नविन लग्न झालेल्यांनी लवकर अपत्यप्राप्ती केलेली बरी कारण पुढे पुढे याचा त्रास त्यांनाच जास्त होणार आहे ...तसेच मुले व मुली लवकर वयात येताय व लवकरच म्हातारे पण दिसताय व होतील ..कारण हायब्रीड मुळे त्यांना कसदार खायला मिळत नाही व पुढे मिळणार नाही...कारण जेवढ्या प्रकारच्या भाज्या व धान्य बाजारात उपलब्ध आहे ते सर्व हायब्रीड आहे व कस नसल्याने त्यातून पोषक तत्व काहीच मिळत नाही त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती नाहीशी झाल्याने कर्करोगाचे (cancer) प्रमाण झपाट्याने वाढत आहे ..अस म्हणताय की भविष्यात प्रत्येक घरात कर्करोगाचा पेशंट राहील त्यामुळे वेळीच जागे व्हा व हातपाय हलवा व निरोगी व पौष्टिक खा ,लाडू बनवा ,धावा,चाला,काहीतरी तरी व्यायाम करा नाहीतर परीणाम भोगायला तयार रहा...
●कर्करोगाच्या पेशी आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असतात पण जेव्हा जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा त्या प्रचंड अॅक्टीव होतात...त्यामुळे आपल्या हातात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय आहे....जर शरीरच निरोगी नसेल तर जगायचे कशासाठी?कुणासाठी?.
●मला असे सांगायचे आहे की ..रोज नियमाने सकाळी दूध हळद व ड्राय फ्रूट जसे की काजू , बदाम, अक्रोड, अंजीर, मनूके,खजूर,गुळ व फुटाणे,गुलकंद, मध,च्यवन प्राशन वगैरे हे घेतले पाहिजे..वजनाची चिंता करू नका,त्यासाठी रोज कमीतकमी ५ किमी पर्यंत जोरात चाला किंवा तरूण असेल तर धावण्याचा व्यायाम करा,योगा करा,प्राणायाम करा...काहीतरी तर करा..!!केल्याने होत आहे रे ,आधी केलेच पाहिजे.!!
●तसेच आता श्वसनरोगपण खूप आलेत जसे की डेंगू,चिकनगुनिया,स्वाईनफ्लू,बर्ड फ्लू,झिका वायरस वगैरे. तर त्यासाठी रोज कोमट दुधात हळद,व गिलोय,(गोळी,पाने,कांडी,रस,काढा सकाळ/संध्याकाळी घ्या)आवळा रस व कोरपड रस व तुलसी पाने वगैरे रोज घेतले पाहिजे..
●आपण आपल्या घराच्या गॅलरीत मनी प्लँट ऐवजी कोरपड व गिलोय वेल कंपलसरी लावली पाहिजे. तसा सरकारने नियमच करायला हवा...असे मला वाटते.
●कारण आताच्या पीढीची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने ते बळी पडताय..त्यामुळे ह्या सर्व वनस्पती मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते..स्त्रीयांमधे ओव्हरीचे(PCOS/PCOD) आजार खुप वाढले आहे तसेच वंध्यत्वचे प्रमाण खूप वाढले आहे....आता नियमितपणे व्यायाम व चांगले उच्च व मुळ पदार्थ खाणे व नियमीत पणे पुरेशी झोप हे तीन नियम अवश्य पाळावे...
●काम्पुटर व इंटरनेट व मोबाईलवर मुळे सर्व मुले व मूलींची तरूण पीढी बरबाद होतांना दिसते आहे अन ते रात्रदिवस ,तासनतास एका जागेवर बसून गेम खेळायचा रोग लागलाय,तसेच हेडफोन मुळे कानाचे व मेंदूचे आजार बळावलेय पण हे किती घातक आहे हे सर्व त्यांना वेळ गेल्यावरच कळेल... अस दिसतय..त्यातल जे चांगलं व उपयोगी आहे, ते न घेता ,जे वाईट आहे त्याकडे आकर्षित होवून जास्त ओढले जाताय व आता विभक्त कुटुंबामुळे त्यांना समजून सांगणारे कुणी राहीले नाही.... त्यामुळे हा एक प्रचंड मोठा धोका येवून ठेपला आहे...त्यांना आता जर समजले नाही तर त्यांची पीढी व पुढली पीढी अतिशय कमजोर व वेडसर राहणार आहे हे सांगायला ज्योतिषी लागणार नाही...तरी प्रत्येकाने विचार करून त्याप्रमाणे निर्धार करून त्याची अमलबजावणी करावी..
●माझे मत खूप संयमाने वाचून घेतले त्याबद्दल ग्रुप मधील सर्व वाचकांना धन्यवाद.🙏🙏🙏
●ता.क.सदर लेख आपल्या कुटुंबासह मुलांना वाचण्यास द्यावा किंवा त्यांच्या मोबाईलवर पण पाठवा व त्यांच्या मित्रांना पण वाचण्यास द्यावा ही विनंती. माझ्या नावासह शेअर करण्यास व फाॅरवर्ड करण्यास मान्यता आहे.
●Creator@vgpatil_nashik●
Comments
Post a Comment