Skip to main content

#त्या शाळेला "आत्माच" नाही,..

ज्या शाळेत "स्वामी विवेकानंद" "डाँ कलाम" व "डाँ.आंबेडकर" शिकविले जात नाही.त्यांचे साहित्य वाचन,चर्चा केले जात नाहीत, त्या शाळेला "आत्माच" नाही,असे म्हणावे लागेल.
           टिच्चून वाचन कसे करावे? वाचनात रमावे कसे? याचे धडे बहुतेक शाळांत देणे "बंदच" झाले आहे.प्रेरणादायी वाचक व एकाग्रतापूर्वक वाचन यासाठी डाँ आंबेडकर,डाँ.कलाम वा स्वामी विवेकानंद हे उत्तम उदाहरणे आहेत.
          शाळेतून आज केवळ धडे संपविणे एवढंच ते काम होत आहे.....नियोजनातील एक घटक......
बाकी बरेच अध्ययन अनुभव जे मुलांना ज्ञानग्रहणासाठी उद्युक्त करतात असे अनुभव बंद झाल्यागत वाटतात.......पण माझ्या मित्रयादीत असलेले....१.श्री.बोचरे सर२.श्री.डुंबरे सर३.श्री.हजारे सर ४ श्री. मिसाळ सर ५. अजून बरेच..........हे सर्व मंडळी आपल्या उपक्रमशीलतेने शाळांना जीवंत ठेवताहेत.
                सर्व शाळांना असे एखाद शिक्षक लाभले तरी भारतीय शिक्षण अजून समृद्धा होईल.अंततोगत्वा भारतीय समाजमन प्रकाशमान होईल.
                 वाचनालये आज वृत्तपत्र वाचनाचे केंद्र ठरत आहेत.वाचनातून चिंतनशीलता व चिंतनातून समंजस प्रवृत्ती वृद्धीस लागते.समाजात निरोगी वातावरण वाढीस लागते.विचारमत विरोधी असल्यासही ग्रंथवाचन सवयीमुळे दोन परस्परविरोधी विचारसरणीचे सख्खे मित्र बनु शकतात,याचा प्रत्यक्षानुभव मी घेतलेला आहे.
           वाचनाने जीवनास समर्पक वळण मिळते.विचारक्षमता प्रगल्भ होते.संकुचितता जावून सर्वसमावेशकता येते ..हीच तर सहिष्णुता होय.
            एकंदरित काय तर,वाचनाने समाज समरस व सुशिल बनण्यास मदत होते.
             सामाजिक व राष्ट्रीय जीवन सुंदर व सुगठित बनविण्यास वाचनाची अनिवार्य आवश्यकता आहे.
आणि शाळा व सार्वजनिक वाचनालये समाजाच्या बौद्धिक जडणघडणीसाठी विद्यमान आहेत.
            जन्मजात बालकांना बौद्धिक वातावरण द्यायची  जबाबदारि पालक व आईबाबांची,तर वयोगट ६ते१८ शाळांची,तर पुढे स्वयंअध्ययनाने काँलेजातील वाचनालयांची व पुढे पौढावस्थेत आपल्या घरीच साहित्य संपदा व साहित्यसुधा निर्माण करायची जबाबदारी घेत ती पार पाडण्याची गरज आहे.
              सर्व वयोगटातील मनुष्यांना वाचनसंस्कारांची चळवळ राबवायची जबाबदारी समाजातील सर्व "सुशिक्षित"समजणतर्या वर्गाची आहे.
               कारण,वर्तमान काळ जरा सकारात्मक विषय सोडून नकारात्मक विषयांवर अधिक वेळ देत आहे.प्रसारमाध्यमे सुंदर,सच्छिल व संस्कारी घटनांना जेवढी प्रसिद्धी देत नाही तेवढी बलात्कार,खून,विचित्र घटना ज्यांचा संस्कार क्षम वयोगटातील बालक/बालिकांना याचे काही सोयरसूतक नसते.
                 बालमन ढवळून निघत आहे संभ्रमात टाकणार्या घटना बघताना समाजमाध्यमांवरील......!
         खरंतर पत्रकारांना बालमानसशास्त्राचे भान ठेवत विवेकनिष्ठ बातम्यांना स्थान देत समाजात सकारात्मकता आणावी.

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...