Skip to main content

#मध

मधाचे आश्चर्यकारक १५ फायदे

मध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आम्ही चुकत नसू तर तुमच्या स्वयंपाकघरात मध नक्की असेल आणि नसेल तर हा लेख वाचल्यावर नक्की तुमच्या घरात मध येईलच.

नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वजन वाढवतेही.

मधाचे १५ फायदे पुढील प्रमाणे

१) मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.

२) कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.

३) उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.

४) रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.

५) हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.

६) रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.

७) मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.

८) उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.

९) पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो.

१०) चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल.

११) रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.

१२) मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे.

१३) टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रासदूर होतो.

१४) मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.

१५) मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...