Skip to main content

#गरजेची शिक्षण पद्धती....

गरजेची शिक्षण पद्धती...........
              आज वैभववाडी गावाठी बाजारात भाजी विक्रीकरताना काही कॉलेजच्या मुली दिसल्या.  चौकशी अंती समजले फोंडाघाट येथील मराठे कृषि कॉलेजच्या विध्यार्थीनी आहेत.  कृषी कॉलेजात शिक्षण घेत असताना प्रात्यक्षिकावेळी  पिकवलेल्या भाजीची विक्री करायला त्या बसल्या होत्या. 
               त्यांच्या भाजीविक्रीच्या वेळी मला कुठेच फार्स दिसला नाही,  केवळ फोटो साठी किंवा प्रोजेक्ट साठीचे नाटक नाही,  बरोबर प्राध्यापक नाहीत,  कॉलेज युवती असल्याचा अविर्भाव नाही.   केवळ आणि केवळ भाजी पिकवताना घेतलेल्या मेहनतीचे फळ चाखाण्याची आसक्ती दिसली.  ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागण्याची शैली दिसली, आपली भाजी काशी चांगली हे पटवून देण्याची कला दिसली, आणि कॉलेज युवतीचा चेहरा भाजी दुकाना बाहेर ठेऊन मराठमोळ्या शेतकऱ्याची मुलगी दिसली!
                या विध्यार्थीनींचे आणि त्यांच्या कॉलेजचे कौतुक करायला हवे.  कारण केवळ फोटो पुरते उपक्रम राबवून प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा  प्रत्यक्ष कृतीवर भर दिलेला दिसला .   या विद्यार्थिनींच्या उपक्रमातून  खऱ्या गरजेच्या शिक्षणपद्धतीचा  कुठेणा कुठे वापर केला जातोय याची जाणीव झाली आणि मनस्वी आनंद झाला!
भरतेश कापसेे

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

#हृदयस्पर्शी किस्सा "

रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण -- *एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* - "नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढ...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...