Skip to main content

*बिनधास्त जगा मित्रांनो*

*बिनधास्त जगा मित्रांनो*
*शेवट लक्षात ठेवा*👉
                    
●एकदा का चाळिशी पार केली की 'जास्त शिकलेला' आणि 'कमी शिकलेला' दोघेही सारखेच ...
(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)

●पन्नाशीनंतर तर 'सुंदर' आणि 'कुरूप' हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच
(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )

●साठीनंतर तर 'मोठी पोस्ट' आणि 'लहान पोस्ट' असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच
(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)

●सत्तरी पार केल्यानंतर 'मोठे घर' आणि 'लहान घर' असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच
(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)

●ऐंशीनंतर गाठीशी 'भरपूर पैसा' असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच
(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )

●नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर 'झोपणे' आणि 'उठणे' यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच
(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)

अजुन शंभरी पार करायची ईच्छा आहे का ?

जीवन साधे-सरळ-सोपे आहे...उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणू नका.

*एक लक्षात ठेवा...लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.*
*स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण...... जिंदगी ना मिलेगी दोबारा*

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...