Skip to main content

#शंभुराजे.,

शंभुराजे ! एका झंझावाती वादळाची सुरूवात......
    दिलेरखानाच्या छावणीत गेल्यापासुनच खरतरं ह्या वादळाला सुरूवात झाली हाेती. पण गेले तीन दिवस आम्ही जे अनुभवताेय त्याला ताेडचं नाही. त्या कपटी ,मुत्सद्दी दिलेरखानाच्या राजकारणाला बळी पडलेले युवराज कसे सुखरूप बाहेर पडतील ह्याची फार उत्सुकता लागली हाेती. आणि हळुहळु आग पेटु लागली.... 'आम्ही स्वराज्याचा गुलाल आहाेत आणि गुलाल हा उधळण्यासाठीच असताे, जाे ह्या गुलालात न्हाउन निघताे त्याच्याकडे उरते ती फक्त एकच आस एकच श्वास स्वराज्य!' बाेलत युवराज हाेते पण स्वाभिमान आमच्यात पेटुन उठत हाेता. त्यानंतर ठरल्याप्रमाणे गाेष्टी पुढे सरकत हाेत्या , आज्ञेप्रमाणे ज्याेत्याजी वात पेटवायला सरसावला हाेता पण ताे दिलेरखानाचा माकडं मुल्ला आडवा आला इतक्यात पांढरे आईंची कुस धन्य करायला त्यांचा बका.. बकाजीराव पांढरे सरसावले कि... त्या मुल्लाला थाेपवायला पण नियतीने त्यांना त्यांत वीरमरण दिलं . माेघलाईत राहुन स्वराज्यासाठी हाैतात्म्य पत्करलं पांढरे सरदारांनी आणि त्यांचं वीरमरण चटका लावुन गेलं. खरचं किती माेठी ताकद हाेती ना "स्वराज्य" ह्या एका शब्दांत! ठरल्याप्रमाणे दारूकाेठाराने पेट घेतला आणि इथे स्वराज्याच्या छाव्यानेही पेट घेतला आणि आड येणा-या गनिमांवर सपासप वार करत अखेर दिलेरखानाच्या छावणीतुन आपल्या स्वजनांसमवेत बाहेर पडलेच. पण वाट चुकले आणि पठाणी सरदारांच्या तावडीत सापडले म्हणजे आगीतुन सुटले पण फाेफाट्यात सापडले तरीहि हार मानतील तर ते युवराज कसले??? चाैघजणचं पंधरा वीस गनिमांवर तुटुन पडले आणि क्षणार्धात त्यांचा धुव्वा उडवला! त्यांच्या सळसळणा-या उसळलेल्या तलवारी आणि पाठी सिंहाचा ,शिवबाचा छावा..... हे संगीत ऐकताना आणि पाहताना जणु त्या काळातच हरवुन गेलाे काही क्षण! त्यानंतर त्या मुल्लाच्या हाती अक्कासाहेब सापडल्या. पण तरिही खात्री हाेतीच कि युवराज थाेडीच सापडु देतील शिवकन्येला तेही त्या बावळट मुर्ख मुल्लाच्या हातात आणि तेच झालं साक्षात शिवकन्येवर तलवार ठेवणा-या माकडाचा हातचं कलम केला शंभुराजांनी!
        ह्या सा-या प्रसंगात ज्याेत्याजी,रायप्पा, बहिर्जी ,खबरगीर ह्या सा-यांचीही कमाल वाटत हाेती ,किती जिवाचा आटापिटा करतायतं ते स्वराज्याच्या भविष्याला सुखरूप स्वराज्यात परत आणण्यासाठी. ह्या सर्व मावळ्यांमुळेच स्वराज्य दिमाखात उभं राहिलं हाेतं. हे पावलाेपावली  जाणवतयं हा पराक्रमी इतिहास पाहताना!
     अमाेल सरांपुढे तर नतमस्तक व्हावसं वाटतयं, ज्या जाेषाने ,त्वेषाने, उर्मीने ते शंभुराजे साकारतायतं ते पाहणं आमच्यासाठी पर्वणीच ठरतेयं. त्यांच्या संवादातुन ,युद्धकाैशल्यातुन आम्हाला शंभुराजेंचाच आभास हाेताेय. आम्ही काही शंभुराजे पाहिले नाही पण इतिहासाने त्यांच्यावर केलेल्या अन्यायाची चीड, अपमान ,ह्या सा-यांची परतफेड आम्हांला अमाेल सरांच्या माध्यमातुन दिसतेयं. साक्षात ताे ज्वलनज्वलनतेजस इतिहास आम्हांला. हे त्यांचे रूण आहेत अवघ्या मराठी जनांवर,महाराष्ट्रावर!🚩

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...