खरंच 'या' सवयी बदलून टाका!
बऱ्याचदा धावपळीमुळे आपल्याकडून दिवसभरात अनेक चुका होत असतात. या चुकांचा परिणाम नकळत आपल्या मनावर, शरीरावर होत असतोच पण आपल्या अपयशामध्ये अशा चुकांचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे आज आपण अशा कोणत्या चुकीच्या गोष्टी करतो? त्याचा थोडा विचार करूयात...
▪ कामासाठी झोपेचा बळी देत असाल तर चूक करताय. कारण दिवसभर काम केल्यानंतर थकवा येणे साहजिक आहे. अशात तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
▪ कामाच्यामध्येच अचानक काही लक्षात आले की तुम्ही सर्च करायला लागता. अशातच तुमचा खूप वेळ व्यर्थ जातो.
▪ ब्रेकफास्ट टाळून आपल्याला वाटते की, आपण वेळ वाचवला पण याने एनर्जी कमी होते. सकाळी योग्य आहार घेतला नाही तर दिवसभर आपण पाहिजे तेवढे आउटपुट देऊ शकत नाही.
▪ अरे यार! हे करायचे तर होते पण चल संध्याकाळी नक्की करेन किंवा उद्या तर कन्फर्म. अशाच गोष्टी आपल्याला अपयशाकडे घेऊन जातात.
▪ प्रत्येक पाच मिनिटाने सोशल मीडिया चेक करायचा की, कोणाचा मेसेज किंवा इमेल तर नाही ना आला. अशामुळे आपण दिवसभरात किमान 2 तास तरी वाया घालवतो.
▪ अनावश्यक मीटिंगमध्ये अधिक वेळ वाया घालवणे यासारखी दुसरी वाईट गोष्ट कोणतीच नाही.
▪ रिसर्च सांगतो की, एका वेळी अनेक काम करण्याची क्षमता केवळ 2 टक्के लोकांमध्ये असते. त्यामुळे एका वेळेस एकच काम करा आणि असे करा की सर्व बघत राहतील.
▪ जर आपल्या हे माहीत नसेल की कोणते काम आधी करायचे आहे? तर आपण वेळ वाया घालवत आहात. त्यामुळे प्राधान्य ठरवून कामे करा.
Comments
Post a Comment