* *जुन्नर **
-------------
*स्वर्गाहुनही सुंदर ...*
*त्याचे नाव जुन्नर ...!*
*नद्या नाले डोंगर*
*जणु हिरवाईची चादर ..!*
*पिंपळगांव जोगा माणिकडोह वडज येडगांव*
*जलाशयांचा हा मुबलक ठाव ..!*
*शिवनेरी लेण्याद्री ओझर*
*भाविकांचे माहेर घर ..!*
*माळशेज दाऱ्या नाणेघाट*
*पर्यटकांच्या मौज मस्तीचा थाट ..!*
*अशोक अंकुश अमोल*
*कलाकार आहेत अनमोल ..!*
*रघुवीर मंगला विठा दत्तोबा चंद्रकांत पांडुरंग*
*फुलवले लोककलेचे अंतरंग ...! ! !*
*हभप रामदासबुआ मनसुख, डेरे बाबा असा*
*सांप्रदायिक लाभला आम्हांस वारसा ..!*
*टॉमेटो द्राक्षं कांदा बटाटे केळी भेंडी ऊस*
*शेतकरी पिकवून जनता होती खुश ..!*
*पारुंडे अर्धपिठ, ओतूर तांदळाच्या पिंडी , आळे रेडा समाधी*
*पर्यटन तालुका महाराष्ट्रात सर्वाआधी ..! !*
*जिथे घेतला जन्म वाघानं*
*पावन झाली भूमी शिवाजी महाराज नावानं ..!*
*शिवाई मंदिर ज्याच्या मस्तकावर*
*नाव तयाचे किल्ले शिवनेरी जुन्नर..!*
*स्वर्गाहुनही सुंदर*
*नाव त्याचे जुन्नर ...! !*
*जु जुनं ते सोनं*
*न्न नवं जे नाविन्य ,*
*र रममाण , रमणीय , रुढी*
*परंपरा जपणारं..*
*एक निसर्ग रम्य ठिकाण*
*म्हणजे जुन्नर...!*
Comments
Post a Comment