मी पैसा बोलतोय*
सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो,
मी आहे पैसा. माझ रूप साधारण आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे.
मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो.
आहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात.
आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही,
परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात.
मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात.
हे सत्य आहे कि मी देव नाही पण लोक माझी देवा प्रमाणे पूजा करतात.
खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत.
मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वतःचाहि जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात.
मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हाला सगळ विकत घेऊन देऊ शकतो.
मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो .......
..... पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत.
मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो ......
.....पण तुमच वय नाही वाढऊ शकत.
मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो .......
.....पण गेलेली वेळ नाही.
मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो ......
.....पण आदर नाही.
मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो ....
.....पण शांत झोप नाही.
मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो .....
.....पण विद्या नाही.
मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो ......
.....पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.
म्हणून लक्षात ठेवा
*पैसा हेच सर्वस्व नाही*
*पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका* .
पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका.
माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही.
आपल कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परीवार, आप्तेष्ठ हेच आपले धन आहे.
त्यांना जाणीव पूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हाला देवाच बोलावण येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत.
तुम्ही केलेला परोपकार, दुसऱ्यांना दिलेला आनंद, मातृ पितृच भक्ती, त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे. तेव्हा सेवा, साधना करा.
मग आयुष्यात तुमच्या सारखे सुखी कोणीही नसणार...............
धन्यवाद !
*पैसा*
[10/3, 5:18 PM] Shivaji Ghadge: *सुंदरता नसली तरी चालेल*!
*सोज्वळता असली पाहीजे*!!
*सुगंध नसला तरी चालेल*!
*दरवळ असायला पाहिजे*!!
*नातं नसलं तरी चालेल*!
*आपुलकीचे बंधन असायला पाहिजे*!!
*भेट होत नसली तरी चालेल*!
*स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे*!!
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂
Comments
Post a Comment