गुन्हेगार कोण????
मी पोलिस ठाण्यातील मित्राकडे कामानिमित्त गेलो होतो.त्याचं ठाण्यातील काम संपेपर्यंत मी बसून होतो.तेव्हा एक स्री आपल्या अभियांत्रिकीची पदवी पुर्ण केलेल्या मुलीला घेऊन पोलिस स्टेशन मधे रडत रडत आली.माझा नवरा मला मारझोड करतो,माझं काहीही ऐकत नाही.मला घरखर्चासाठी पैसे देत नाही.माझी आगोदर FIR दाखल करा म्हणून आग्रह करत होती. माझ्या पोलिस मित्राने त्या स्त्री ला शांत केले.व हकिकत सविस्तर विचारली.ती स्री सांगू लागली एका ट्रॕव्हल एजन्सीमधे नवरा कामाला आहे.दारु पित नाही कुठलेही व्यसन नाही.पण सर्व पैसे आईवडीलांनाच देतात.आमच्याकडे लक्ष देत नाही.इत्यादी .पोलिस मित्र FIRदाखल करायला टाळाटाळ करत होता.(त्यांचा याप्रकारचे अनेक वाद समुपदेशन करुन मिटवता येतात असा अनुभव होता म्हणून)त्यांनी त्या स्रीची समजूत घातली व तिला बाजूला बसवून मुलीककृडून तिच्या वडीलांचा मो.क्रं. घेतला काॕल करुन त्या व्यक्तीला स्टेशनला बोलावले व त्यांना त्याच्या बायकोच्या व मुलीच्या तक्रारी विषयी सांगून त्याला त्या विषयी समज देत असतांना तो सांगू लागला .साहेब माझा संसार सुरळीत आणि काटकसरीने चालू होता .पण या दोनचार वर्षात वडील थकले.आईला काम होत नाही .म्हणून मी माझ्या व पत्निच्या खर्चातील जिथे वाचवता येतील तेथील काही पैसे वाचवून वडीलांना देतो .या काळात या दोघींनी मला मदत करायची सोडुन मी जेंव्हा जेंव्हा वडीलांना पैसे देतो,त्यावेळी यांना साध्या साध्या गोष्टीसाठी गरजेपेक्षा जास्त पैसे पाहिजे असतात.साहेब मला जेमतेम पगार मोठ्या अडचणीतुन मुलीला इंजिनियर केले.अजुनही पुढिल शिक्षणासाठी मी काहीतरी करेन पण शिक्षण किंवा गरज तितकी महत्त्वाची असली तर ना! मी का बरं देणार नाही?ह्या दोघी वडिलांना पैसे देतो म्हणून वाद घालतात.
खरचं चुकिचं कोण असावं? मायलेकी ?की तो गृहस्थ ? तो थकलेला बाप?की ज्यामुळे लेकाचा संसार उध्वस्त होण्याची वेळ आली..
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment