🏏 _*क्रिकेटमध्ये 'डक' हा शब्द का वापरतात ?*_
🤔 *काय कारण ?*
एखादा बॅट्समन शून्यावर आउट झाल्यास त्याला 'डक' असं म्हणतात. 'डक' शब्दाचा अर्थ बदकाचं अंडं असा होतो. बदकाचं अंडं हे शून्याच्या आकाराचं असतं. म्हणूनच शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूला 'डक' असं म्हटलं जातं.
🦆 *कधी सुरु झाला वापर ?*
'डक' या शब्दाचा प्रथम उल्लेख 17 जुलै 1866 मध्ये झाला. 'प्रिन्स ऑफ वेल्स' शून्यावर बाद झाल्यावर एका वृत्तपत्रानं 'प्रिन्स बदकाच्या अंड्यावर बसून तंबूत परतले' असा मथळा असलेली बातमी प्रसिद्ध केली होती आणि तेव्हापासूनच शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांसाठी 'डक' या शब्दाचा वापर केला जातो.
Comments
Post a Comment