जीवनात समस्या असतातच . कधी त्या अंदाजाने तर कधी नजरअंदाजाने सोडवाव्या
काही वेळेला समस्या फार मोठी नसतेच आपण
तीला आपल्या विचारानेच जास्त मोठी करतो.
एका राजा ने अतिशय सुंदर 'महाल' बनवला आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक 'गणिताचे सूत्र'लिहीले आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोनी खोलेल त्याला मी माझा उत्तराधीकारी घोषित करेन .कारण राजा निपुत्रीक होता व त्याला राज्य अश्या व्यक्तीकडे द्यायचे होते कि ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असली पाहिजे .घोषणा ऐकून
राज्यातले मोठे मोठे गणितज्ञ आले आणि सूत्र पाहुन निघून गेले कारण अस सुत्र त्यांनी आयुष्यात पाहिल नव्हत . मुदतीचा शेवटचा दिवस आला त्या दिवशी ३ लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करू त्यामधील २ जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते आणि एक त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता . गणितन्यानी वेगवेगळी सुत्रे वापरून पाहिली पण दरवाजा उघडु शकले नाही ? सर्व लोक हैराण झाले कि जिथ एवढे मोठे गणीतज्ञ हरले तिथे हा शेतकरी काय करील बिचारा साधासुधा माणुस होता. शेवटी त्याला सांगण्यात आल की चला तुमची वेळ आली आहे . शेतकऱ्याने सहज स्मित केल दरवाजाकडे गेला सूत्र वाचल पण त्याला काय कळणार ?शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याहळुन त्याला मागे ढकलले .आणि काय आश्चर्य दरवाजा सहज उघडला . सर्व हैराण झाले आणि त्याच्या नावाचा जयजयकार केला .नंतर त्याचा सन्मान करुण राजाने सहज विचारल की आपण काय सूत्र वापरून दरवाजा उघडला ? तो शेतकरी नम्रपणे म्हणाला की मी विचार केला कि गेले सहा दिवस एवढे मोठे विद्वान सुत्रे वापरतात पण दरवाजा उघडत नाही मग सुत्रच् खोटे असावे आणि दरवाजा पाहिला तर त्याला कडीकुलुप पण दिसत नाही ? मी ठरवलच होत की समस्या काय हे पहिले बघू नंतर ती कशी सोडवायची ते ठरउ आणि मी तेच केल .
कित्येकवेळा जिवनात ''समस्या'' ही नसतेच पण आम्ही त्या विचारांनिच अर्धमेले होतो की ती कशी सुटेल आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटील बनते,
जीवन दुःखी होण्याच हेच मोठ कारण आहे की आम्ही नको तिकडे जास्त लक्ष देतो .
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment