Skip to main content

#सकारात्मकता व नकारात्मकता...


सकारात्मकता व नकारात्मकता...
प्रत्येक गोष्टीला दोन नव्हे तीन बाजू असतात.
जसे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात असे म्हणतो पण तिसरी पण बाजू असते ती म्हणजे  परीघाची...तुम्ही म्हणाल  अस कसं?
तर हाच आपला बघण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजे की आपण एखाद्या गोष्टीचे निरीक्षण सर्व दिशेने करणे,बारकाईने करणे..हेच फार महत्वाचे असते.त्यामुळेच तर आपण वेगळे ठरत असतो.

तर हेच बघा..ना.

आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी करतो..
जसे की सकाळी पहाटे उठतो ,मग सर्व विधी आटोपतो किंवा नाश्ता करतो ,शाळेत अथवा कामावर जातो ,काम करतो,घरी येतो,घरातील कामे करतो हे असे अनेकानेक  छोटे अथवा मोठे कामे करतो...
आता ह्या कामाबद्दल जरा खोलात जावून विचार करू.
सकारात्मकता म्हणजे काय? अशा व्यक्तीला कुठलीही गोष्ट सांगण्याची गरज पडत नाही,तो स्वतःच सर्व गोष्टी न सांगता करतो.

सकाळी जो स्वतःच पहाटे ५ वा. नित्यनेमाने उठणार, उठल्याबरोबर सर्व विधी आटोपून नियमीतपणे कमीतकमी ५ किमी फिरायला जाणार,नंतर नित्यनेमाने व्यवस्थित ७ वा. आंघोळ वेळेवर करणार, त्यानंतर सकाळी  ८ वा.नाश्ता करणार,घरातील अस्ताव्यस्त कपडे व घर स्वतःच आवरणार व स्वच्छ करणार,घरात व बाहेरील कामासाठी कुटूंबाला मदत करणार, घरात किचनमधे कामात स्रियांना मदत करणार,कपडे व भांडी स्वच्छ करण्याचे काम करणार ,जेवण वेळेवर करणार व लगेच इतर काम आवरण्यासाठी मदत करणार, झाडांना पाणी घालणार,घरातील व्यक्ती आजारी पडली तर स्वतःच दवाखान्यात नेणार, आजूबाजूच्या लहान मुलांना व वयस्कर लोकांना मदत करणार, तसेच बाहेर कुठेही मदत लागली तर करणार,नेहमी मदतीस तयार असणार, स्वतःचे सरकारी अथवा खाजगी कामे स्वतःच उरकून घेणार, जीवनात वाईट गोष्टींना फाजील महत्त्व न देणारा,मोबाईल व टिव्ही व काॅम्पुटर यांचा वापर मर्यादीत करणार,त्याचे दुष्परिणामांचा विचार करणार,रोज पौष्टिक पदार्थ आहारात घेणार,रोज फळे खाणार,...इ.

एकदंर काय..तर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्व करणे..जेव्हा अशा गोष्टी कुणी करताना आपल्याला दिसल्यास आपण समजून जायचे की तो मनुष्य सकारात्मक विचारसरणीचा आहे तसेच याच्या विरूध्द जो वागताना दिसेल तो नकारात्मक विचारसरणीचा असतो त्या पासून चार हात दूर रहावे. अशा लोकांच्या बोलण्यात व वागण्यात ,विचारात, हावभावात, तसेच त्यांनी पाठवलेल्या मोबाईल संदेशात नकारात्मकता किंवा अहंकार व उर्मटपणा,उद्धटपणा, फुशारकी,अहंभाव, दुसर्याला कमी वा कस्पटासमान  लेखणे,दुसर्याला नावे ठेवणे,कायम दुसर्याचा अपमान करणे वा अपमानास्पद वागणूक देणे, माज दाखवणे इ. अनेक  नकारात्मक गोष्टी दिसतात किंवा जाणवतात ,मग अशा व्यक्ती जवळची असो की लांबची,मित्र असो की शत्रू, त्याच्याकडून चारहात दूरच असावे कारण त्या व्यक्तीच्या नकारात्मकेचा आपल्या मनावर कळत नकळत वाईट परिणाम होत असतो....

मग आपण सकारात्मक विचारसरणीच्या व्यक्तींची रोज रोज योग आल्यास संगत जास्तीत जास्त केली पाहिजे अथवा भेट तरी घेतली पाहिजे किंवा अनेक जे काही थोर व्यक्ती आहेत किंवा होवून गेलेले आहेत त्यांचे विचार आपण अवश्य करून वाचले पाहिजे ( उदा.स्वामी विवेकानंद, सर अब्दुल कलाम वगैरे )  व अशा व्यक्तींचे आपण अनुकरण अथवा अनुसरण (follow) केले पाहिजे.असे केल्याने आपल्या मधे प्रचंड उर्जा, आत्मविश्वास, सकारात्मकता , चेहर्यावर तेजस्वीपणा आपोआपच निर्माण होतो व आपण नकारात्मक गोष्टीपासून दूरदूर जातो व आपल्याला चुकीच्या व वाईट गोष्टी आवडतच नाही .मग अशा व्यक्ती जीवनात लवकर प्रगल्भ होतात व त्यांच्या भोवती एक तेजोवलय (AURA-the distinctive atmosphere or quality that seems to surround and be generated by a person, thing, or place.)निर्माण होते,ज्यामुळे आजूबाजूचे लोकांवरपण त्या व्यक्तीचा नकळत चांगला प्रभाव पडत असतो. व त्याचा फायदा त्यांनापण होतो.त्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या जीवनात पण सकारात्मकता यायला लागते व त्यांनापण प्रेरणा मिळून त्यांच्यात प्रचंड उर्जा व आत्मविश्वास येतो व ते यशस्वीपणे पणे जीवनात वाटचाल करतात..

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...