" आम्ही बि घडलो, तुम्ही बि घडाना."
अनेक चुकीच्या रूढी परंपरा विरुद्ध अनेक जण लढले. मी पण लढलो.तुम्ही पण लढायला हवे असे वाटतं, पण आग्रह नाही. जिवनामध्ये जेवढे चांगले जगता येईल, तेवढे जगावं. मी जगतोय म्हणून इतरांनी जगायला हवे असा आग्रह नसावा. भाषा सौम्य, प्रेमळ , असावी. जे चुकीचे आहे ते सांगण्याचे धाडस व आत्मविश्वास असावा. माणसं तोडणे हा आपला उद्देश नसावा तर माणसे जोडून , माणूसकी निर्माण करून एक आनंदी नवसमाज निर्माण करून, स्वातंत्र्य, समता, बंधूता निर्माण व्हावी हा प्रामाणिक उद्देश असावा. आपण मनात आणले तर काही तरी करू शकतो हे मात्र खरे. त्याकरिता आत्मविश्वास असायला हवा.
मी अभिमानाने सांगेल की, माझ्या आईने मरणोत्तर नेत्रदान व देहदान केलेत. प्रखर विरोध असुन सुद्धा माझ्यातील आत्मविश्वासाने ते शक्य झाले. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी च्या शिकण्याकरिताच्या उणिवा आपण्यास माहितच आहे. आईच्या प्रेरणे मुळे समाजाला, विद्यार्थी ला कितपत फायदा झाला न झाला ह्याचा उहापोह इथे करायचा नाही. एवढे मात्र खरे की, समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम मात्र नक्कीच झाले.
तुम्ही मनात आणले तर , तुम्ही आपली मानसिकता बदलवू शकता.
"आम्ही बी घडलो , तुम्ही बि घडाना. "
@ राजू नाईक @
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment