Skip to main content

#विचार तर कराल...

विचार तर कराल - भारताला हजारो दाभोलकरांची गरज आहे.

*नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येकाने शेवटपर्यंत वाचावे* .
आज सकाळी मंदिरातून घरी जात होते तेव्हा मला माझा एक जुना मित्र भेटला .

मित्र : अग स्वाती तू इथे कुठे ?
मी : अरे हाय, घरी चालले होते .तू कसा आहेस ?
मित्र : मी ठीक पण ....(बोलता बोलता त्याच लक्ष माझ्या पायांकडे गेलं .माझ्या पायात चप्पल नाही हे पाहून आपोआप त्याच्या कपाळावर आठी उमटली .
मित्र : तुझी चप्पल कुठे आहे ? मंदिरात कोणी चोरली का ? (त्याने हसून विचारलं )
मी : नाही रे .नवरात्रीचे उपवास चालू आहेत .गेले चार वर्षे न चुकता पाळते मी .अनवाणी पावलं ,फळ आणि दुधाचा उपवास.
(माझं बोलणं ऐकून पाठीत कोणीतरी धपाटा घातल्यासारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले आणि मी ते पाहिले)
मी : अरे गप्प का झालास ?
मित्र : जाऊ देत .तू रागावशील .
मी : अरे नाही रागावणार .तू बोल .
मित्र : स्वाती जरा स्पष्टच बोलतो .
तुला वाटते हे सारे नऊ दिवस चप्पल न घालता फिरल्यावर तुला पुण्य लाभेल ?पूर्ण होईल ? (तो मंदिराच्या पायरीवर बसलेल्या भिकरिनीकडे बोट दाखवून म्हणतो ) ती बघ, तीस वर्षाची भिकारीन आणि तिची बारा वर्षाची पोरगी.
यांनी आयुष्यभर चप्पल नाही घातली तु तर उपवासाला फळे खातेस हे तर कित्येक दिवस फक्त पाणी पिऊन दिवस काढतात. ही फार श्रीमंत असायला हवी होती.
स्वाती तु बी कॉम आहेस.
आजच्या युगातले तु फॉरेन कल्चर आपलंसं केलं.
तुला माहीत आहे मंदिरातील मूर्ती एका मूर्तिकारांची कलाकृती व्यतिरिक्त काहीही नाही तरी तिच्यावर इतका विश्वास.
स्वाती तु विज्ञानाच्या जगात विज्ञान वापरते पण त्याला आत्मसात केले नाही.
तू जरी आजच्या मॉडल जमान्यात वावरत असशील तरीही तुझी मानसिकता हजारों वर्षे पुर्वीचीच आहे.

नऊ रात्रीच्या नऊ दिवसांत नऊ रंगाच्या साड्या वापरल्याने देवी प्रसन्न होत नसते तर पुरुषांना नेत्रसुख मिळत .

सावित्रीबाईंनी तुम्हा स्त्रियांना सुधरवण्यात आयुष्य घालवल पण तुम्ही अजून नाही सुधरलात .)

*तो बोलत होता पण मी त्याला थांबवलं नाही .त्याची ही जुनी सवय आहे हे मला माहित होतं* .

मी : तुझं बोलून झालं असेल तर मी काही बोलू ?
मित्र : बोल .तुझ्याच बोलण्याची मी वाट पाहतोय .
मी : तू तुझ्या मॅरेज अॅनिव्हर्सरिला बायकोला काय गिफ्ट केलंस ?
मित्र : ३००० हजाराची साडी गिफ्ट केली .
मी : एक स्त्री दोनशे रुपयाच्या सफेद साडीने स्वतःच शरीर झाकू शकते तरीही तू तिला इतकी महागडी साडी दिलीस .ती साडी नेसल्यावर लोकांनी तिच्याकडे टकमक पाहावं म्हणून का ?
मित्र : नाही .
मी : मग नवरात्रीत वेगवेगळ्या साड्या नेसणाऱ्या बायका नेत्रसुख देतात अस का म्हणतोस ? जर स्त्रिया एका रंगामुळे गरीब -श्रीमंत,मालकीण - नोकर ,शिक्षित-अशिक्षित ,सवाष्ण-विधवा असे भेद विसरून एकत्र येत असतील तर ते चूक कस ? उलट या मुळे नारी एकता वाढते .(माझं बोलणं ऐकून त्याचा आवेश ओसरला)
मित्र : अग पण हे उपवास ,अनवाणी चालणं याला काही अर्थ आहे का ? या पेक्षा कोणत्या गरिबाला चप्पल दान करायची .
मी : मला एका प्रश्नाचं उत्तर दे .आपण लहान मुलांना महापुरुषांची चरित्र का वाचायला देतो ?
मित्र : कारण त्यांनी महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन आयुष्यात काही तरी करून दाखवावं .
मी : अनवाणी चालण्या मागे हेच कारण आहे की मनोधैर्य वाढावं .देवी हे शक्तीच रूप आहे .या काळात उन्हामुळे तोंडाला स्कार्फ बांधणाऱ्या मुलीही रस्त्यावरील खड्यांची पर्वा न करता अनवाणी चालतात .यातून आत्मविश्वास मिळतो जर आपण भुकेवर नियंत्रण मिळवू शकतो ,रस्त्यातले खाचखळगे पार करू शकतो तश्या आयुष्यातील अडचणीही सोडवू शकतो .देवाच्या पाया पडून प्रगती होत नाही पण प्रगतीसाठी लागणारी जिद्द अशा गोष्टीतूनच मिळते आणि तेलकट ,तिखट ,तुपकट खाण्यापेक्षा उपवासाच्या निमित्ताने फळे ,दूध खाण्याचे  फायदे तुला माहीत असायला हवेत तेवढं तुझं शिक्षण आहे .
तुला अस का वाटलं मी फॉरेन कल्चर मानते ? माझ्या देशात इतकं चांगली संस्कृती असताना फॉरेनर व्हायची गरजच काय ? सावित्रीबाईंच्या हजारो वर्षे आधी लोपामुद्रा ,विश्ववारा ,घोषा यांनी ऋग्वेदत गाथा रचल्या आहेत .सुलभा ,मैत्रेयी ,गार्गी अशा कित्येक स्त्रियांनी पुरुषाला लाजवेल अशी कामगिरी केली आहे .स्त्रियांच्या स्वाभिमान आणि अब्रूसाठी राम कृष्ण ,महाराणा प्रताप , शिवरायांसारख्या वीरांनी शस्त्रे उचलली आहेत .जिथे स्त्रीला देवी मानतात अशा संस्कृतीत माझा जन्म झाला .
आणि मॉडर्न होणं म्हणजे काय तर आपले विचार बदलणं .तोकडे कपडे घालून मॉडर्न आणि प्रगती करता आली असती तर बिकिनी वापरणाऱ्या नट्या चंद्रावर गेल्या असत्या .इस्रोमध्ये काम करणाऱ्या महिलाही साडीच वापरतात .
सावित्रीबाईंनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला पण कपाळावरच कुंकू आणि पदर सांभाळून .त्यांनी जिजाऊंना आदर्श मानलं आणि जिजाऊंनी भवानी मातेला म्हणून शिवाई देवीच्या आशीर्वादाने शिवबा जन्मले .
दानधर्माचं म्हणशील तर दान करणारे आस्तिकच जास्त असतात कारण नास्तिक तर पाप पुण्य मानत नाहीत .मीही माझी पावसाळी चप्पल कोना गरिबाला देऊन नवरात्रीला सुरुवात करते .(माझं बोलून ऐकून तो आता पूर्ण शांत झाला होता ) बाय द वे मंदिरात गेलास तर दानपेटीत एक रुपया नक्की टाक कारण इथे नऊ दिवस भंडारा असतो तुझ्या एक रुपयाने कोणाचं तरी पोट नक्की भरेल .
( माझ्या बोलण्यावर तो काही न बोलताच निघून गेला .पण तो यावर नक्की विचार करेल याची मला खात्री वाटत होती .सृष्टीत प्रत्येक गोष्टीला एक कारण असत आणि ते मानवाने समजून घेतलं तरच त्याच भलं आहे. )

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...