संगोपन मुलांचे.
खरच आपली पीढी नवीन पीढी घडवत आहे का? आपल्या मुलांवर तुम्ही खरोखर प्रेम करता का? तुम्हाला आहारा संबंधीत सर्व माहिती आहे का? तुमचं मूल प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करता का? तुमचं मुलं हक्काने तुमच्या कडे काहीं मागत का? तुमचं मुलं आवडीने जेवत का?मुलांच्या आवडीनिवडी तुम्हाला माहित आहेत का?.तुमचं मुल कुपोषित किंवा अति लठ्ठ आहे का? तुमच मुलं सतत दडपणाखाली असतं का?तुमचं मुल स्वच्छंदपणे वागत का? तुमचं मुल उत्साही आहे का?तुमचं मुल सतत मोबाईल किंवा तत्सम उपकरणात गुंतलेलं असतं का ?तुम्ही मुलाला सतत आमिष दाखवता का? तुमच्या मुलांना तुम्ही सतत भिती व दडपणाखाली ठेवता का.मुल मन मोकळेपणान तुमच्याशी बोलते का?
घरातील वडीलधार्यांवरतुमचा विश्र्वास आहे का?तुम्हाला मुलांच्या आवडीनिवडी माहित आहेत का? फक्तआपणच आपल्या मुलांची काळजी घेवू शकतो असं तुम्हाला वाटतं कामुलांच्या बाबतीत सासुसासर्यांना किंवा आपल्या आई वडीलांना संगोपणाबाबत काहीच माहिती नाही असे तुम्हाला वाटते का? आत्मचिंतन केले तर ह्या सर्व प्रश्र्नांची उत्तर मिळतील.
मानसिक व शारीरिक दृष्ट्या स्वस्थ ,आनंदी ,
निर्भ़य उत्साही,मैदानी व बैठे खेळ दोन्हींची आवड असणारे, प्रत्येक चांगल्या गोष्टी जसे संगीत ,गाणी, वाचन व्यायाम खेळ यात भाग घेणारे , सर्व गोष्टी आईवडीलांशी शेअर करणारे मूल , वेळप्रसंगी बालहट्ट करणारे मूल ,
तुम्ही बनवलेला पदार्थ आवडीने खाणारे मूल....अस जर तुमचं मुल असेल तर तुम्ही मुलांचे संगोपन योग्य प्रकारे करीत आहात.हे जर नसेल तर एक मात्र नक्की की प्रथम सुधारणा तुम्ही स्वतात करायला हवी.मुलांच्या जागी स्वताला ठेवा,जस्या तुमच्या आवडीनिवडी तस्या मुलांच्याही असतात ,त्या जपायला शिका.
घरातील वडीधार्यांनीही तुम्हाला घडविण्यात आयुष्य घातलेलंअसतं.आपल्यालच सर्व येत या भ्रमात राहू नका.
त्यावेळी फास्टफुड नव्हते सर्व तयार करुन दिले जायचे व पोष्टीकही असायचे म्हणून पूर्वीच्या पीढीला आहाराचे ज्ञान नक्कीच जास्त आहे कारण सर्व काही स्वता करायची तयारी असायची.या ठिकाणी मला दोन पिढ्या मधील फरक दाखवायचा नाही.सांगायच तात्पर्य शेवटी अनुभव श्रेष्ठ असतो.शेवटी अनुभवाचा फायदा घ्यायचा का आपलेच खरं करायचं हे ज्याचं त्याने ठरवायच.
पण एक मात्र नक्की तुमच्या चुकीचे आहार कल्पणांचे ओझे बालकांवर लादू नका आणि त्यांचे बालपण व बालसुलभ लीला त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका.आधी स्वता शिका.अभ्यास करा आहार ज्ञानाचा आणि बालकांच्या मानसिकतेचा ,चुकीच्या गोष्टी आपोआप मागे पडतीलआणि योग्य तेच घडेल.मानसिक आणि शारीरीक दष्ट्या सुदृढ बालक घडावी हीच खरी तळमळ आहे.
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment