Skip to main content

फक्त केले पाहिजे रे !!

सुर्यनमस्कार कां घालायचे?
सुर्य नमस्कार का घालायचे? आपल्याला शाळेत  आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की--आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.--

आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा  जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!! एक दिवस 

फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो,प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व  न पचलेले अन्न शरीरा बाहेर  पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.

  सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी 5 ते 12 नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे.

 1985 साली मला एक गृहस्थ भेटले. वय 72 होते. मला म्हणाले--मला दोन दिवस संडासला झाली नव्हती, डायबेटीस,गुडघे दुखी होती. (हे बोटीवर कॅप्टन होते) 69 व्या वर्षी आयुष्यातील पहिला सुर्यनमस्कार घातला आणि संडासला धावलो. जोशी आता किती नमस्कार घालत असेन सांगा. मी म्हणालो २०-२५ घालत असाल. ते म्हणाले- रोज 156 नमस्कार घालतो माझे सर्व त्रास गेले 

ह्या गृहस्थाचे पासून मी स्फुर्ती घेतली व नमस्कार चालू केले. माझा अनुभव असा की रोज 5 ते 12 नमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.

  नमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. 10 ते 15 मिनीटे लागतात. घरी करणे असल्याने  जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.

फक्त केले पाहिजे रे !!? 

कृपाया सर्वांना हा मॕसेज पाठवा प्रत्येकाला सूर्यनमस्काराचे महत्त्व कळायला हवे....

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...