Skip to main content

#खारटपणा...

एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार अाहे.
परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.

माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येणारंच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.

लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.

काही दिवसानंतर - धाकटी सून स्वयंपाक बनवत होती,
तिनं भाजीला मीठमसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली.
त्यानंतर मोठी सून आली, न चाखताच मीठ टाकलं, आणि कामाला निघून गेली.
त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या.

जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तर भाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेलं आहे. त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला.

त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला, तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं? बाबांनी जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं. नंतर त्यानं विचार केला जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू?
त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं.

संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मी निघून चाललो आहे.
माणूस म्हणाला कां? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्लं तरीपण भांडण केलं नाही.
ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.

*तात्पर्य*: भांडण आणि इर्षा यामुळं आपलं नुकसानच होतं.
ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथं लक्ष्मी नेहमी नांदते...

-

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

#हृदयस्पर्शी किस्सा "

रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण -- *एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* - "नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढ...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...