💐💐
नारळ आडवा करून त्याला मधोमध एक छिद्र पाडून त्यात गाईच्या गोवर्यांचा बारीक चुरा भरून घ्यावा.
आता त्या नारळाला काळ्या कापडात गुंडाळून घ्यावे.
मग अमावस्येच्या मध्यरात्री आपल्या पासून दक्षिण दिशे कडे असणार्या पिंपळाच्या, ज्या पिंपळाला पार बांधलेला नसेल त्या झाडाखाली काळ्या कपड्यात गुंडाळलेला तो नारळ जमीनीत सव्वातीन फूट खोल अशा पद्धतीने पुरावा की त्याला पाडलेलं छिद्र हे जमीनीकडे राहील. मग पिंपळाला १२३ उलट्या प्रदक्षिणा माराव्यात व प्रत्येक प्रदक्षिणे नंतर खड्ड्यात थोडी थोडी माती टाकत जावी.. व शेवटच्या प्रदक्षिणेला उरलेली सर्व माती टाकून खड्डा बुजवून प्रदक्षिणा पूर्ण करावी. हे सर्व होताच पाठीमागे नं पहाता तिथून आपल्या घरी परत यावे पण घराच्या बाहेर पाय धुवूनच घरात प्रवेश करावा
हा उपाय केल्याने पेट्रोलचा भाव निम्म्यावर येतो
😆😆😆
Comments
Post a Comment