आडवाटेच नंदनवन..!!!
हम्पी ला जायचं 'का' आणि 'कशासाठी' याच उत्तर इथला एक न एक दगड देतो..
म्हणजे त्यांची उत्तर तयारच असतात .आपण फक्त प्रश्न पाडून घ्यायचा, निघायचं आणि इथं येऊन ती ऐकायची .त्यांच्याच भाषेत..त्यांच्याशीच एकरूप होऊन...!!!
आयुष्यात एकदा तरी इथली दगड-माती आपल्या कपाळी लावावीच..!!
विजयनगर साम्राज्य ही काय चीज होती ह्याच कौतुक पोर्तुगीज, चिनी, तिबेटीअन समकालिनांनी अगदी भरभरून केलं यात आपल्या "दैदिप्यमान इतिहासाचा" मोठेपणा पेक्षा त्यांना इथे येऊन व्यापार करण्याची "गरज" आणि संधी जाणवली ही समजून घेण्यासाठी.!!
जे काही करायचं ते भव्य दिव्यच असलं पाहिजे ह्या विजयनगर च्या प्रत्येक अधिपतीच्या 'अट्टाहासा'ला शिरसाष्टांग दंडवत घालण्यासाठी...!!
हरिहर, बुक्क, कृष्णदेवराय ही आपल्यासाठी केवळ नाव नसून आजही धुमसणाऱ्या प्रेरणांचा निक्खळ स्रोत आहेत ते कसे हे जाणण्यासाठी....!!
बहामनी सैतानां पुढं हतबल झालेल्या एक न एक भग्न मंदिर आणि शिल्पांच्या श्वासांतला हुंकार ऐकण्यासाठी...!!
ज्या तुंगभद्रेने विजयनगर चा इंद्रदेवालाही लाजवेल असा वैभवसंपन्न काळ आणि त्याच्या पतनाचा काळाकुट्ट अध्याय दोन्ही अनुभवले तिच प्राक्तन ऐकण्यासाठी..!!
आणि शेवटच..
इतिहासावर भरभरून प्रेम करण्यासाठी..
#गजांत_लक्ष्मी_अलंकृत
#वैभवसंपन्न...!!
#विजनयनगरम_साम्राज्यम
#हम्पी
Comments
Post a Comment