विजय पांडुरंग भटकर (भारतीय संगणकशास्त्रज्ञ )
विजय पांडुरंग भटकर (ऑक्टोबर ११, इ.स. १९४६ - हयात) *हे मराठी, भारतीय संगणकशास्त्रज्ञ* आहेत.नांलदा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.
भारताने अमेरिकेने संगणकविक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात २ जून १९८८ रोजी केली. भटकर हे तेव्हा 'इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर'चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला काम करीत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. असे असून, *डॉ. विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला*. त्याला उद्देशून ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ ही बातमी दिली होती.
👉 *सन्मान आणि पुरस्कार*
▪ भारत सरकारकडून पद्मश्री -२०००
▪ महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०००
▪ भारत सरकारकडून पद्मभूषण -२०१५
▪ राजर्षि शाहू महाराज पुरस्कार -
▪ विदर्भ गौरव पुरस्कार -
▪ विदर्भ भूषण पुरस्कार -
▪ विश्वरत्न पुरस्कार -
▪ विश्वेश्वरय्या स्मृति पुरस्कार -२००२(कोल्हापूर)
▪ विज्ञानगौरव पुरस्कार -
Comments
Post a Comment