२१ दिवस सतत एखादी क्रिया केली की ती तुम्हांला सवय होउन जाते . . .
Surya the brave soldier हा मुळ दक्षिण भारतीय चित्रपट निवांत वेळ होता म्हणून पाहण्याचा योग आला. ह्या चित्रपटाला निर्मात्यांकडून मानस शास्त्र ला जोडण्याचा प्रयत्न केला गेला.चित्रपटामधे नायकाला अति राग येण्याची विक्रुती असते.ह्या त्याच्या सवयी ने त्याची खुप हानी झालेली असते.पण त्याचे त्याला काही देणंघेणं नसते.त्याचे स्वप्न असते की त्याला देशाच्या सिमेवर बंदुक घेऊन उभं राहयच आहे.तो भारतीय सेनादलाच्या सेवेत असतो पण त्याला सीमेवर ड्युटी मिळालेली नसते.
त्याच्या शिघ्र राग येण्याच्या सवयी मुळे घरच्या पासुन तोडला जातो.त्याला मित्र नसतात.प्रेम करणार हक्काचा कुणी नसतो. लष्करांमध्ये त्याच्या ह्या सवयी मुळे कोर्ट मार्शल होते .खुप विनंती केल्यावर एका अटीवर नोकरीवर घेतले जाणार असते.
ती अट अशी असते की त्यावेळचे असणारे मानसतज्ञांन कडून संमती आणून देने.ते मानसतज्ञ नायकाचे वडिल असतात आणि राग येण्याच्या सवयी ने त्याने त्यांच्याशी असणारे सबंध तोडलेले असतात.ते त्याला सांगतात तुला एकाच अटीवर संमती देईल जर तु तुझ्या रागावर नियंत्रण ठेऊ शकशील तर,मानस शास्त्र सांगते. २१ दिवस न विसरता सातत्याने एखादी गोष्ट केली तर व्यक्तिवर त्याचा परिणाम होतो. नायकावर त्याचा परिणाम होतो पण तो परिणाम त्याला नकोसा वाटायला लागतो.
मानस शास्त्र सांगते २१ दिवसाची सवय व्यक्तिवर परिणाम करु शकते तर आपल्या नको असणार्या सवयी बदलून बघायला काय हरकत आहे. कदाचित बदलाला सामोरे जाण्यासाठी २१ दिवस देता येतील पण धैर्य (पेशन) ठेवणं गरजेच आहे. धैर्य ठेवता आले तर छोट्यात छोटे व मोठ्यात मोठे व्यसन किंवा वाईट सवयी व्यक्ति बदलवू शकतो.
. . .
Comments
Post a Comment