संसार तसा चार शब्दांत मांडता येतो,
ओळख,लग्न,मधुचंद्र आणि नंतर जे काही उरतं ती टेस्ट क्रिकेट मॅच.
पहिले तीन शब्द "वन डे क्रिकेट" सारखे खेळले जातात,
रिझल्ट पटकन हातात येतो.....
... जोडप्यातले दोघे आपापल्या राग,दोष,क्रोध,हर्ष,व्यसन खेळांडून समावेत ह्या मॅच खेळायला मैदानात उतरतात.
"ओळख" हा सामना सर्वात महत्वाचा...
ओळख झाली ती चुकीच्या व्यक्तीशी झाली कि पुढचे सगळे सामने खेळण्या आधीच हरल्यासारखे असतं,
आणि
तीच ओळख योग्य व्यक्तीशी झाली कि खेळाचे मैदान पण नंदनवन ठरतं.
आणि अशा नंदनवनात सगळ्या सामन्यात समोरच्याचे जिंकणच आपला जिंकणं असतं...
शेवटची टेस्ट क्रिकेट मॅच खूप वेळ खेळली जाते...बहुतेकदा रटाळवाणी असते...
पण तरीही हि दोन्ही साथीदारांनी खेळावीच....
आयुष्याच्या शेवटी म्हातारपणात जोडीदारांनी संपूर्ण "स्कोअर बोर्ड" एकत्र बसून पहावा....
आणि
सामना कुणीही जिंकले असले तरी मिळालेली "ट्रॉफी" दोघांची आहे असे समजून
"एक यशस्वी संसार" असा दोघांनी सही केलेला चेक डोळे भरून पहावा...
आणि तो चेक पाहताना...
आयुष्याच्या शेवटी जगलेला संसार आठवून डोळ्यांत सुखाचे पाणी नाही आले तर तो संसार कसला.....
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment