*ध्यान गुहा - श्री क्षेत्र माणगाव, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र*
श्रींच्या मंदीरापासून १५-२० मिनीटाच्या अंतरावर अवघड पायवाटेने झाडे झुडपे पार केल्यानंतर श्री वासुदेवानंद सरस्वतींची ध्यान गुहा आहे. या ठिकाणीच ध्यान धारणा करून श्री स्वामी महाराजांनी दत्तमहाराजांना प्रसन्न करून घेतले. मुंबईचे एक सिध्द पुरुष श्री सदानंद ताटके उर्फ़ आनंदस्वामी यांनी गुहेपर्यंत पायऱ्या करून घेतल्या आहेत. गुहा म्हणजे दोन दगडांमधील पोकळी आहे. ही नैसर्गिक गुहा साधारण १५ X १५ आकाराची असून आत छोटीशी वासूदेवानंद सरस्वतींची मूर्ती आहे. येथे २४ तास पणती तेवत असून तेथे साधकांस अत्यंत अनुभव येतात. उच्च कोटीची स्पंदने जाणवतात. मन:शांती काय असते याचा खरा अनुभव येथे जाणवतो. दत्त भक्त येथे जप, ध्यानधारणा, गुरुचरित्र पारायणही करताना जाणवतात. महापौर्णिमेस येथे सत्य दत्ताची पूजा असते. ५-६ हजार लोक प्रसादास येतात.
संस्थानचा कारभार विश्वस्त मंडळातर्फे होतो. येथे पालखी, अभिषेक, पारायण, अन्नदान सेवा दत्तभक्त करू शकतात. येथे भोजन व निवासाची सोय आहे. मुंबई गोवा महामार्गावर सावंत वाडीस उतरून माणगावला जाता येते. श्रीमन नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेने हे दत्तमंदीर निर्माण झाले व त्याचा जिर्णोद्धार व विस्तार केला.मोठे भक्तनिवासही आहे.
*ही माहीती आपल्या इतरांनाही शेअर करा*
Comments
Post a Comment