नव-याने तिला विचारले.....
लग्नाला झाली वर्ष कितीतरी,
अजून तुझे नवेपण....
मला एकदा सांग तरी
असतं काय हे माहेरपण....
आठ दिवस सुटटी घे
अन मस्त धमाल कर
shopping hotelling मनसोक्त करु
हवय कशाला माहेरपण
तिने मधाळ हसत उत्तर दिले......
वर्ष सरोत कितिही ,
ओढ काही सरत नाही....
सासरी गेल्याशिवाय खरंतर
माहेरपण कळत नाही....
सासरच्या सुखाच्या ओंजळीच मी
खरतर माहेरी उधळत जाते...
अन त्याच आनंदाच्या घागरी
त्यांच्या डोळ्यातून रित्या करते....
दारात माझी वाट पाहणा-या
आईचि मग मी नव्याने मैत्रीण होते,.
काल वेळेचे तिचे गणित मग माझ्या गप्पांतून जुळत जाते...
पिल्लं सोपवून आईकडे
मैत्रीणींचा जमतो कट्टा...
कितीतरी जुन्यानव्या तासनतास मारतो गप्पा...
भेटीगाठीतून नव्याने मग अस्तित्वाच्या जुन्या खुणा शोधते,
माझी हरवलेली मी मला तिथेच सापडते...
माहेरपण म्हणजे पुन्हा एकदा
बालपण मी जगून घेते..
प्रत्येक स्त्रीला असे
एक गाव असावे....
'माहेर' असे त्याचे
नांव असावे....
वर्षातुन एकदातरी माहेरी जायला मिळावे
एकदातरी जाण्यासाठी मन आतुर असावे
जाड झालेल्या लेकीला 'वाळलीस ' म्हणणारे बाबा असावे....
नजरेच्या एक्सरे मधून मन जाणणारी आई असावी...
'बसा तुम्ही आवरते मी' अस म्हणणारी वहिनी असावी...
पीठ मळणे नि गूळ किसणे नि कसली किचकट कामे नसावी...
भाचवंडावर आत्या ने प्रेम करावे....
आणि भाचवंडाना फिरवायला
मामा अानि मामि असावि...
घर असो कौलारु किंवा मुंबईसारखा फ्लँट...
माहेरवाशिणीला वाटतो तिथे इंद्रप्रस्थाचा थाट...
जुने फ़ोटो पाहून ... मन सुखावे...
हसता हसता मधूनच डोळे भरुन यावे...
ऊन पावसाचा असा
खेळ रंगात यावा...
आणि अचानक परतीचा दिवस जवळ यावा...
सासरच्यांनी तिथे कधीतरीच ड़ोकवावे...
म्हणुन माहेर आणि सासर ह्यात थोडेतरी
अंतर असावे...
थोडेतरी अंतर असावे....
प्रत्येक स्त्रीला असे
एक गाव असावे.
Comments
Post a Comment