Skip to main content

#तूमच्यापैकी कितीजणांना हे माहीत आहे?

तूमचा जवळचा मित्र किंवा नातेवाईक शहराबाहेर गेले आहेत. तेथे ते कोणालाही जवळून ओळखत नाहीत. अशा परीस्थितीत त्यांचे पैशाचे पाकीट एटीएम कार्डसहीत हरवते...

कशी असेल ती परीस्थिती...? विचार करा 🤔🙄

तूम्ही अशावेळी राहत्या ठिकाणाहून त्यांना कशी मदत करू शकाल?

खुप सोपे आहे... जवळच्या मोठ्या पोस्ट ऑफिसमधे जा... त्यांना सांगा, तूम्हाला आयएमओ IMO (इंस्टंट मनीऑर्डर) करायची आहे. पेई नाव, पैसे पाठवणाराचे नाव, रक्कम वगैरे लिहून फॉर्म भरा... पैसे भरा. तूम्हाला एक बंद लिफाफा दिला जाईल.

लिफाफा उघडा आणी तूम्हाला त्यावर सोळा अंकी नंबर दिसेल. तो नंबर तूमच्या पाकीट हरवलेल्या मित्र वा नातेवाईकाला एसएमएसद्वारे पाठवा... जो त्या ठिकाणच्या जवळील मोठ्या पोस्ट ऑफिसमधे जाऊन एक फॉर्म भरून सोळा अंकी नंबर लिहील व तेथे तूम्ही भरलेले पैसे त्याला मिळतील.

तूम्ही १००० ते ५०००० पर्यंतची रक्कम अशा रितीने पाठवू शकता. हे तूम्ही वेस्टर्न युनियन ट्रान्सफरसारखे पैसे पाठवणे समजू शकता... पण देशभरात खुप मोठे नेटवर्क असलेले पोस्ट ऑफीस तूम्हाला कोणत्याही ठिकाणाहून सेवा देवू शकतात. शिवाय पोस्ट ऑफिस अशा ठिकाणीही आहेत जेथे वेस्टर्न युनियनचा मागमूसही नाही.

हे तूमच्या माहीतीसाठी; ही सेवा संपूर्ण भारतात जवळजवळ ४०००० ठिकाणी उपलब्ध आहे.

तूमच्यापैकी कितीजणांना हे माहीत आहे?

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...