सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा कसा बनला माहितीये?*_
_पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बुधवारी (दि. 31) गुजरातच्या अहमदाबादमध्ये लोहपुरुष पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे अनावरण करणार आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात..._
▪ गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात नर्मदा नदीतल्या साधू बेटावर सरदार सरोवर प्रकल्पाजवळ हा पुतळा आहे...
▪ हा पुतळा ज्या पायावर आहे तो पाया 25 मीटर उंच आहे आणि पुतळ्याची उंची 167 मीटर आहे. या दोन्हीची एकत्र उंची 182 मीटर होते...
▪ या प्रकल्पाची नियोजित किंमत 2,232 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 42 महिने लागले. तोपर्यंत सर्व खर्च 3,000 कोटी रुपये झाला असे सांगण्यात आले आहे...
▪ स्टॅच्यू ऑफ युनिटीचे वजन 67,000 मेट्रिक टन आहे. भूकंप, पूर किंवा सोसाट्याचा वारा यापासून संरक्षण व्हावे अशी रचना करण्यात आली आहे...
▪ या पुतळ्याची उंची पाहता सोसाट्याचा वारा आल्यावर हा पुतळा तग धरेल की नाही अशी शंका होती. त्यासाठी या क्षेत्रातल्या नामवंत कंपनी RWID यांची मदत घेण्यात आली. 60 मीटर प्रतीसेकंद या वेगाने जरी वारा आला तरी या पुतळ्याला काही होणार नाही...
▪ हा पुतळा बनवण्यासाठी 12,000 कांस्य पॅनेल तर 1850 टन कांस्य लागले...
Comments
Post a Comment