Skip to main content

#गावाकडला सुदामा सुद्धा...

*एक छान कविता*

गावाकडला सुदामा सुद्धा
फेसबुकवर टाकतो पोष्ट...
बदललेल्या गावाची
सांगतो तुम्हाला गोष्ट.....।।

गावं माणसं शेतीवाडी,
सगळं झालयं ओल्ड...
कांताबाई,शांताबाईसुद्धा
झालीय आता बोल्ड...।।

शेतकरी झालायं फार्मर,
मळा झालायं फार्म...
झोपडीत लागलायं एसी,
तापमान झालयं वार्म.....।।

लोण्याला म्हणती बटर,
अन् पाण्याला म्हणती वाटर...
तुपालाही म्हणू  लागलेत आता देशी घी,
देशी पीताना म्हणती थोडं वाॅटर टाकून पी...।।

काळ आता बदललाय,
नवं नवं आलयं टेकनीक...
पिटलं भाकरी खाण्यासाठी,
निघू लागल्यात पिकनीक.....।।

धोतर टोपी सद-याऐवजी,
घालू लागलेत जीन्स....
लुगड्याऐवजी गाऊन घालून,
फिरु लागल्यात क्विन्स....।।

हरीपाठाऐवजी आता ,
करु लागलेत प्रेयर...
म्हातारासुद्धा म्हातारीला,
म्हणू लागलाय डियर...।।

गावाकडल्या हागणदारीचा,
मोठा झालाय इश्यू.....
दगडपाण्याऐवजी आता,
टाॅयलेटला लागतोय टीश्यू.....।।

नाती संपली शेती संपली,
गावाचं झालयं व्हिलेज...
पिकपाणी सांगणारं ,
आटून गेलयं नाॅलेज....।।

वायफाय ईंटरनेटमुळं,
बरबाद झालीय पिढी...
बांधावरली पोट्टेसुद्धा ,
घोकू लागलीत एबीसीडी....।।

फेसबूक, व्हाटसअॅपपायी,
तरुण झालेत मॅड...
कर्जामुळं निराशेपोटी,
आत्महत्त्येचं आलयं फॅड....।।

एवढचं करा गाॅड विठ्ठला,
आता पावसाळ्यात पाडा रेन....
हॅपी होवू द्या फार्मर,
कमी होवू द्या पेन.....।।

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

#हृदयस्पर्शी किस्सा "

रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण -- *एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* - "नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढ...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...