हे छायाचित्र साऊथ आफ्रिकेचे फोटोजर्नलिस्ट केविन कार्टर यांनी सूडान मध्ये १९९३ च्या दुष्काळात काढले होते . या चित्राला त्यांनी "The vulture & the little girl" हा मथळा (caption) दिला होता . या चित्रामध्ये एक गिधाड भूखेनी जीव जात असलेल्या छोट्या मुलीच्या मरणाची वाट पहात आहे , असे दाखविण्यात आले आहे . या छायाचित्रासाठी कार्टर यांना 'पुलित्जर' पूरस्काराने गौरविण्यात आले . परंतू या पूरस्काराचा आनंद ते काही काळच घेऊ शकले कारण काही महिन्यांनी वयाच्पा ३३ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला . काय झाले असेल त्यांना ? ...........जेव्हा ते त्यांना मिळालेल्या पूरस्काराचा आनंद साजरा (celebrate) करीत होते तेव्हा संपूर्ण जगातील प्रमुख चॅनल्सवर आणि सोशल मिडीयावर या चित्राची चर्चा होत होती . त्यावेळी एका जर्नलिस्टने त्यांना फोनवर प्रश्न विचारला " छोट्या मुलीचे नंतर काय झाले ? " यावर कार्टर म्हणाले ' ते पाहायला मी थांबू शकलो नाही ' कारण मला फ्लाईट पकडायची होती . हे ऐकून जर्नलिस्ट कार्टर ला म्हणाला " त्या दिवशी तिथे एक नाही तर दोन गिधाड होते त्यापैकी एकाच्या हातामध्ये कॅमेरा होता " . हे ऐकून कार्टर खूप भावविवश झाले परिणामी त्यांनी आत्महत्या केली . ....................कोणत्याही परिस्थितीमध्ये काही मिळविण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो , त्या प्रयत्नांसाठी आपण काहीही करायला तयार असतो ..................पण या सर्व प्रयत्नांच्या पहिले आपल्यामध्ये " मानवता " आली पाहिजे . कार्टर आज जिवंत असते , त्यांनी त्या दिवशी छोट्या कुपोषित मुलीला उचलून " यूनायटेड नेशन्स " च्या फीडींग सेंटर पर्यंत पोहोचवले असते , जिथे पोहोचायचा ती लहानगी प्रयत्न करीत होती ............................सर्वांनाच विनंती .....""" कधी संधी मिळाली तर अशा परिस्थितीमध्ये फोटो काढण्यापेक्षा मदत करण्याचा प्रयत्न करावा """...
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment