Skip to main content

#काही राहून गेलेल्या दीपावली शुभेच्छा..!..

*काही राहून गेलेल्या दीपावली शुभेच्छा..!!*

१. बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना  वेटिंग रूम मध्ये बसुन ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत त्यांचा *नातेवाईक लवकर पुर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा हि शुभेच्छा....,*

२. फटाक्यांच्या दुकानातली गर्दी  पाहूनही जे बालगोपाळ आपल्या *बाबांच्या बजेटमुळे* मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर *फटाके* खरेदी करता यावेत हि शुभेच्छा....,

३. शेजारणीच्या भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब *गृहिणीला* मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं हि शुभेच्छा....,

४. काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं हि शुभेच्छा....,

५. इतरांची दिवाळी आनंदात जाओ म्हणून स्वतःच घराबाहेर कर्तव्य बजावणाऱ्या *जवान, पोलीस, वीज, वाहतूक, आरोग्य कर्मचारी,* यांना कुटुंबियांना बरोबर थोडातरी मोकळा वेळ मिळावा हि शुभेच्छा....,

६. *बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा हि अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पुर्ण व्हावी हि शुभेच्छा....,*

७. गेली कित्येक वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्याना *बापाला यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा* हि शुभेच्छा....!!

शुभेछुक:-
*माणसातल अंतर कमी करणारी माणसं..!!*

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...