Skip to main content

#फिरूनि पुन्हा....

#फिरूनि #पुन्हा

वयाची पंचविशी पार केली आणि एका नात्यातल्या मुलाचं स्थळ तिला सांगून आलं. ती दिसायला सुंदर नव्हती पण अगदीच काही कुरूप ही नव्हती . फक्त तिला चारचौघींसारखा नटायला कधी आवडलं नाही. स्वप्नात रमणारी अशी होती ती. तो खर तर तिच्यापेक्षा थोडा उजवाच होता दिसायला , स्वतःच्या पायावर उभा होता अगदी पाहताक्षणी अस नाही पण एकमेकांशी बोलले आणि जणू काही ती त्याच्या प्रेमातच पडली. दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या विवाहाची बोलणी सुरू केली . इथे दोघांमधला संवाद वाढत होता आणि एकमेकांविषयी ओढ पण. पण नियतीला कदाचित हे मान्य नव्हत कुठून कस पण पत्रिकेचा विषय निघाला आनि मन जुळुनही पत्रिका जुळली नाही म्हणून ठरलेले लग्न मोडलं . ती मनातून कोलमडून गेली पण घरच्यांना विरोध करायची हिम्मत ना तिची होती ना त्याची. हळूहळू एकमेकंपासून ते दोघे पण लांब गेले. जणू पुन्हा कधी समोर न येण्यासाठी. काही दिवसांनी तिला कळलं की त्याच लग्न ठरल त्याच्यासाठी मनापासून खुश होती ती .पण त्याच लग्न झालं आणि मग तिला कळलं की तीच त्याच्यावर किती प्रेम आहे , पण वेळ निघून गेली होती .
                  अश्यातच तीन वर्षांचा काळ लोटला पण तो तिला कधीच भेटला नाही . त्यांच्यात कोणताही संपर्क नव्हता . पण तरीही ती त्याला एक क्षण ही विसरू शकली नाही जेव्हा केव्हा तिच्या लग्नाचा विषय निघायचा ती खूप अस्वस्थ व्हायची आणि लग्न जमल नाही की खुश असायची . एकदाही न भेटता न बोलता ती त्याच्यावर एकतर्फी प्रेम करतच राहिली. तिला सतत ती टोचणी लागून राहिली होती की ,तिने तिचे प्रेम का व्यक्त केले नाही , ते मिळवण्यासाठी काहिच प्रयत्न केले नाही. हाच सल उराशी घेऊन ती जगत होती. आणि नियतीने तिला एक संधी दिली 3 वर्षांनंतर त्याच्या बाळाला जन्म देऊन त्याची पत्नी एका अपघातात त्याला सोडून गेली. जे झालं ते खूपच दुर्दैवी होत ,पण 3 महिन्याच्या बाळासाठी त्याला दुसरं लग्न करण भाग होत . मनातला सल दूर करण्यासाठी आणि तीच प्रेम मिळवण्यासाठी तिने प्राणपणाने प्रयत्न करायचे ठरविले . त्यासाठी कोणत्याही संकटाला तोंड देण्याची तिची तयारी होती . तिला फक्त एकदा प्रामाणिक पणे प्रयत्न करायचा होता.जो तिने केला .त्याचा फोन नंबर मिळवून तिने त्याला फोन केला . मैत्रीच्या नात्याने पुन्हा एकदा त्याचे बोलणे होऊ लागले .
            खूप तुटून गेला होता तो . त्याला सावरलं तिने .जगण्याची नवी उमेद दिली त्याला .असेच काही महिने निघून गेले आणि मग तिने तिच्या मनातलं त्याला सांगितल. आणि त्याच्याशी लग्न करायचे आहे असं सांगितलं त्यानेही वेळ मागितला तिच्याकडे . असेच दिवसामागून दिवस जात होते. तिने घरात सांगितल्यावर जणू काही भूकंप यायचाच बाकी होता घरात. एक भाऊ सोडून तीच्याबाजूने कोणीही उभं नव्हतं . लोक काय बोलतील? , पत्रिकेच काय करायचं एक ना अनेक प्रश्नांना ती सामोरी गेली . पण यावेळी तिचा निर्णय झाला होता काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही . अखेर लग्न करेल तर त्याच्याशी नाहीतर मला लग्नच करायचं नाही असं सांगितल्यावर आणि तिच्या वरच्या प्रेमापोटी तिच्या घरच्यांनी तिला परवानगी दिली. इथे त्याने ही त्याचा होकार तिला कळवला होता . त्याच्या घरच्यांना तयार करण्याची जबाबदारी त्याची होती . त्यानेही मी तुझ्याशिच लग्न करेन नाहीतर लग्न च करणार नाही असं वचन तीला दिल होत . हो नाही करता करता त्यांच्या घरच्यांनाही परवानगी दिली. आता तर जणू ती स्वर्गातच नांदत होती.
         भावी आयुष्याची अगणित स्वप्न तिने त्याच्या सोबत रंगवली होती . ते दिवस च होते तसे कधीच न विसरता येण्यासारखे.तिला जाणीव होती लग्नानंतर तिला खूप काही सहन कराव लागेल पण त्याची साथ असेल तर काहीही सहन करण्याची तिची तयारी होती. पण नियतीला हे ही मान्य नव्हते. अचानक त्याने फोन करण , बोलणं आणि भेटणं बंद केलं . ती ची अवस्था खूपच वाईट झाली होती. घरचे लग्नाची तारीख नक्की करण्यासाठी त्याला भेटायला बोलावत होते आणि तो तर तिला टाळत होता. अश्यातच त्याच्या घरुन निरोप आला की ते हे लग्न मोडतात . ती काहीच करू शकत नव्हती पार कोलमडून पडली ती. तिच्याशी एकदा हि न बोलता त्याने त्याच्यापेक्षा निम्मं वय असलेल्या त्याच्या मेव्हनिशी लग्न पण केलं एका महिन्याच्या आत तेही. आणि ती फिरुनी पुन्हा एकदा कोलमडून पडली ,तीच भावविश्वच उध्वस्त केलं त्याने . तो तर सुखात आहे आणि ती फिरुनी पुन्हा सावरतेय स्वतःला .....

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...