*कुछ तो मिसिंग है बॉस!
दिवाळी म्हटलं की, उत्सकुता, धावपळ, कुतूहल, खरेदी, फराळ, फटाके आणि बरंच काही. मात्र पूर्वी हवी-हवीशी वाटणारी दिवाळी आता कुठेतरी काही तरी हरवल्याची जाणीव करून देत असते.
बर्याचदा आठवते किंबहूना आपण बोलतोही पूर्वी सारखं नाही राहिलं आता. पूर्वी सुख-सुविधांशिवाय मिळणारा आनंद कमालीचा होता. नेमकं काय मिस झालंय याची आठवण करून देण्यासाठी हा लेख प्रपंच...
▪ *पूर्वी* : फटाके कमी असायचे आणि आनंद जास्त!
▪ *आत्ता* : फटाके आहेत पण उडवायला परवानगी आणि वेळ नाही!
▪ *पूर्वी* : फराळाची धावपळ आणि त्यासाठी महिनाभर तयारी असायची.
▪ *आत्ता* : वेळ नसल्याने रेडिमेड फराळाचा ट्रेंड सुरु झालाय.
▪ *पूर्वी* : मामाच्या गावाकडे किंवा आप्तेष्टांकडे जायची ओढ असायची.
▪ *आत्ता* : सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आऊटिंगचा, ट्रिपचा विशेष प्लॅन केला जातो.
▪ *पूर्वी* : महिनाभर घराची रंगरंगोटी, स्वछता, धुणे आधी कामांची तयारी चालायची.
▪ *आत्ता* : जर वेळ मिळाला तर या कामांना प्राधान्य दिले जाते किंवा ती कामगारांकडून करून घेतली जातात.
▪ *पूर्वी* : कपडे, नवीन वस्तू खरेदीची धांदल आणि प्रचंड आकर्षण असायचं!
▪ *आत्ता* : ऑनलाईन आणि डिस्काउंटच्या जमाण्यात कपडे आणि वस्तू खरेदीचे औत्सुक्य राहिले नाही.
▪ *पूर्वी* : दारात रांगोळी, पणत्या, सजावटीकडे विशेष ओढा असायचा.
▪ *आत्ता* : सगळी काही 'आयते' मिळत असल्याने रांगोळी काढणं, सजावटीतलं आकर्षण कमी झालंय.
Comments
Post a Comment