खांदा .....
या जगात खांदा देणारे खूप भेटतील, पण
हात देणारे खूप दुर्मिळ आहेत.
मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.
जिवंतपणी तो अडचणीत असताना त्याला आपल्या आधाराच्या आणि मदतीच्या हाताची खूप गरज असते ,
तेथे हात पुढे करता आला तर त्याच्यासारखे दुसरे पुण्य नाही .
गरजवंताला हात देणारा खरा भगवंत आहे .
पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जीवंत माणसांना हात दिला यावर आपली माणूसकी ठरत असते .
माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे ,
तो जीवंत असताना, अडचणीत असताना का बरे धाऊन जात नाहीत.?
खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते , कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत . पण ही व्यर्थ धावपळ करणारे खूप आहेत , ही आजची माणसे आहेत,
अडचणीच्या काळात धाऊन येण्यासाठी देवच बनावे लागते आणि हे देवत्व नेहमी फार कमी असते आणि हे धाऊन जाणे सार्थ असते.
आपल्या देवाने खांदा दिल्याचे एकही उदाहरण ग्रंथात नाही आणि
अडचणीच्या काळात देव धाऊन आला नाही ,
असे उदाहरण आपल्याला एकाही ग्रंथात सापडणार नाही.
देवत्व असल्याशिवाय मदतीचा हात पुढे करता येत नाही ,
जिवंत माणसासाठी धाऊन जाणे देवत्व आहे आणि
मेलेल्या माणसासाठी धावणे ही फक्त मजबूरी आहे , कारण त्यात भीती असते , मी कोणाला गेलो नाही तर माझ्यावेळी कोण येईल .?
मेल्यावर कोण आले ? कोण नाही आले ?
हे आपल्याला कळणार तरी आहे का ?
आणि कोणीच नाही आले तरी पंचमहाभूते आपल्या देहाला नेल्याशिवाय राहणार आहेत का.?
जे काही धावायचे असेल ते जीवंतपणी,
जिवंत माणासासाठी धावा ,
मेल्यावर खांदा देण्याऐवजी ,
जिवंत असणाऱ्या अडचणीत सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या..
मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल
Comments
Post a Comment