*#आपण खरंच #सेन्स, #माणूसकी, #सदसदविवेकबुद्धी विसरत चाललोय का???*
*#परवा किल्ले #राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी येथे जाण्याचा योग आला.भोसलेवाडीतून किल्ला चढाईला सुरुवात केली, अवघड अशा ट्रेकर्स वापरतात अशा #पाली दरवाजामार्गाने. जसंजसं पुढं जात होतो भयानक दमायला लागलो होतो, त्यात औक्टोबर हिट, घामाच्या नुसत्या धाराच धारा...सोबत आणलेलं पाणी संपलं होतं...आता काय करावं असा विचारच करत होतो एवढ्यात #पायरया चालून येणारया घामाच्या धारा अंगावरुन वहात असलेल्या, #मळक्या शर्टावर असणारया व हाफ ठिगळ लावलेल्या एका ८ ते १० वर्षाच्या #मुलाला बघितलं, एका हातात एक पाण्याची बाटली, दुसरया हातात एक थोडेसे लिंबू शरबत असलेली बाटली. तो मुलगा माझ्याजवळ येऊन म्हणाला "#काका, पाणी बौटल घ्या ना, एकच राहिली आहे" मला तहान तर लागलेली म्हणून मी विचारलं "कितीला आहे?" तो म्हणाला "४०रु." #व्यवहारीक #मेंदूने लगेच मला प्रश्न केला "२०रुपयांची बाटली ४०/- रुपयांना?*
*पण #सदसदविवेकबुद्धी असणारा तसेच सेन्स असलेला #माझा #मेंदू लगेच म्हणाला " बघ त्याच्याकडं, त्याचे मळलेले फाटके कपडे, एवढा गड हातात दोन बाटल्या घेऊन लेकरु चढतंय, तु कुठं भाव करत बसला? मौलमध्ये, मल्टीप्लेक्सला गेल्यावर भाव करतो का तु? ही चलबिचल चाललेली असतांनाच एका बाईने त्याला विचारले " काय झालं रे बाळा?" मी तिच्याकडे बघितले, ती मध्यम वयीन बाई डोक्यावरुन दहा पाणी बौटल घेऊन खांद्यावर एक कसली तरी पिशवी घेऊन मागून गड चढत होती, ती जवळ आल्यावर ते पोर म्हणालं तिला " काय नाय गं, काका घेताय बाटली." त्यानं मला लिंबूशरबत घेण्याबद्दलही आग्रह केला पण मी फक्त पाणी बौटलच घेतली व ते दोघे पुन्हा न बसता तसेच गड चढू लागले.*
*मला क्षणभर डोके बधिर झाल्यासारखं वाटलं कारण काहीच ओझं नसणारी सैक मला जड वाटत होती गड चढतांना आणि या मायलेकाला ओझ्यासह गड चढतांना बघून दयाही वाटली, स्वतःची लाजही वाटली आणि भाव न करता दुप्पट भावाने बौटल खरेदी केल्याचे समाधानही वाटले.*
*महेशसोबत पाली दरवाजा बघून पुढे गेल्यावर राहूलला शोधत असताःना चोर दरवाजाजवळ गेलो. राहुल भेटला नाही म्हणून चोर दरवाजाजवळ जात असतांनाच एक मुलामुलींचा गृप येतांना दिसला त्यात दोन मुली तोकडे कपडे घालून आलेल्या दिसल्या. वाटलं बोलावे पण विचार केला कि पुन्हा स्त्रीस्वतंत्रतावादी एखादा ऊठायचा आणि आपल्याला संस्कृतीरक्षक हा किताब द्यायचा म्हणून पाच मिनिटे तिथंच राहुलची वाट बघितली आणि दोन तीन फोटो तिथं असणारया माकडांची काढली.*
*समोर एक उच्चशिक्षीत वाटणारं असं जोडपं आलं आणि तिथं पाणी बौटल विकणारया मुलीला बौटलची किंमत विचारली तिने ४०/- रु. सांगितल्यावर त्या गृहस्थाने आपले व्यवहारीक ज्ञानाचा परिचय देत एवढी महाग का? लुटताय का आम्हांला? अशा अविर्भावात त्या मुलीला सुनावले. मुलीने शांतपणे आपले संस्कार दाखवत उत्तर दिले "दादा आम्हांला खालून ओझं आणाव लागतंय" क्षणभर वाटले कानाखाली द्यावे याच्या आणि याला विचारावे, पेट्रोल डिझेल गाडीत टाकतांना, मौलमध्ये किंवा मल्टीप्लेक्सला पाणी विकत घेतांना हा प्रश्न कधी केलाय का? खरंच आपण एवढे बधिर झालोय कि कुठं भाव करायचा अन कुठं नाही हे पण आपल्याला सेन्स राहिला नाही?*
*तेवढ्यात राहुलला फोन लावला(रेंज फक्त गडावरच असते) तो आला आणि त्याच मुलींच्या कपड्याकडे बघत मला म्हणाला " सर दोन तीन फौरेनर भेटले त्यात लेडीजपण होत्या पण फुल्ल कपड्यात आणि हे महाराष्ट्रीयन बघा, कसे कपडे घातलेत" मी चेष्टेने म्हणालो देसाईबाई रागवायची आपल्याला".*
*हे सगळं सांगायचं तात्पर्य एवढंच कि, आपण खरंच बधीर झालोय का कि कुठं कसं वागावं, कुठं भाव करावा, कुठं व्यवहारज्ञान(?) पाजळावं, कुठं कोणते कपडे घालून जावं याचा साधा सेन्सही राहिला नाही का आपल्याला? कोणी कोणते कपडे घालावे यात वाद नाहीच फक्त कुठं घालावे हेही आपल्याला कळत नसल तर खरंच डोकं तपासायला हवं आपलं एखाद्या सायक्रैटिस्टकडं....*
*मित्रांनो स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे (हे मी नाही आपली राज्यघटना सांगते) मिळालेल्या सदसदविवेकबुद्धीचा योग्य वापर करा, योग्य ठिकाणी योग्य व्यवहारीक ज्ञान दाखवा, योग्य कपड्यांचा सेन्स वापरावा. माणूसकीला मूठमाती देऊ नका. नसता स्वतःला शिवभक्त वा महाराष्ट्रीयन म्हणवून घेऊ नका कारण महाराष्ट्राची संस्कृती खूप महान आहे. ती जपता येत नसेल तर किमान बदनाम तर करु नका. एवढीच कळकळीची विनंती.*
Comments
Post a Comment