!!! ए.पी.जे. अब्दुल कलाम (ऑक्टोबर १५, इ.स. १९३१) !!!
*डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम* तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम (ऑक्टोबर १५, इ.स. १९३१ - २७ जुलै, इ.स. २०१५) *हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते*. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.
*👉गौरव*
*अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.*
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
*👉कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मान*
▪१९८१ : पद्मभूषण
▪१९९० : पद्मविभूषण
▪१९९७ : भारतरत्न
▪१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
▪१९९८ : वीर सावरकर पुरस्कार
▪२००० : रामानुजन पुरस्कार
▪२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
▪२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
▪२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
▪२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
▪२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
▪२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
▪२०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनार्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
*👉निधन*
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.
Comments
Post a Comment