😃 खतरनाक विनोद 😃
एक माणूस हाॅस्पिटल🏨मध्ये शेवटच्या घटका मोजत असतो.
एक नर्स, त्याची बायको👵आणि तीन मुलं त्याच्या काॅट🛌शेजारी उभे होते.
1)माणूस मोठ्या मुलाला म्हणाला "तू मिलीनियम सिटीमधले पंधरा बंगले घे.
2)मधल्याला सेक्टर तेराचे चौदा बंगले दे आणि
3) धाकल्याला ग्रीन पार्कची दहा दुकान आणि दोन अपार्टमेंट दे आणि
4)तुझ्या आईला तु सांभाळणार असशील तर गोदावरी पार्कचे दहा बंगले तुझ्याकडे ठेव नाहीतर तिला तिच्या मर्जीने काय करायचं ते करू दे.....
मी गेल्यावर सगळे जण गुण्यागोविंदाने रहा."
हे सर्व ऐकल्यावर नर्स👩⚕चाट पडली...
ती त्याच्या बायकोला म्हणाली ...
"किती नशीबवान आहात तुम्ही.. की एवढे पैसेवाले पती मिळालेत आणि जाताने एवढी मोठी जायदाद ठेवून चाललेत."
बायको👵त्रागा करत म्हणाली....
"कसलं डोंबल्याच नशीब अन् कोण श्रीमंत ?
मुडदा रोज सकाळ-सकाळी दारोदार पेपर🗞टाकत होता. अन् आता तो आम्हा सगळ्यांना आपआपला एरिया वाटून देत होता."....👍😜😜😜😜
*बिचारी नर्स👩⚕आजही कोमात आहे. त्याच हाॅस्पिटलात🏨
Comments
Post a Comment