Skip to main content

लोक तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतात .........

दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललोच होतो.

तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला , त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते.

मला आश्चर्य वाटले , मी लिस्ट मधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे त्या पिशवीत ठेवले .

कुत्रा ती पिशवी तोंडात घेऊन निघाला.

मी तो कुत्रा कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे निघालो.

कुत्रा बसस्टाॅपवर येऊन एका बसमध्ये चढला , मी ही त्याच्या मागे बसमध्ये चढलो .

पिशवीवर स्टाॅपचे नाव लिहले होते कंडन्टरने पिवशीमधील पैसे घेऊन एक तिकीट त्याच्या पिशवीत ठेवले .

स्टाॅप आल्यावर कुत्रा बरोबर त्याच स्टाॅपला उतरला , मी ही त्याच्या मागे उतरलो .

थोडे पुढे चालुन गेल्यावर कुत्रा एका घराजवळ थांबला व त्या घराची बेल वाजवली.

एका माणसाने दार उघडले त्याच्या हातात काठी होती .

त्या माणसाने सामान घेऊन त्या कुत्र्याला काठीने खुप मारले .

मी त्या माणसाला माझी ओळख सांगुन कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले.

तो माणुस म्हणाला साल्याने माझी झोपमोड केला चावी घेऊन गेला असता तर माझी झोपमोड झाली नसती.
,
,
,
,
जीवनाची ही खरी सच्चाई आहे
,
लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीच पुर्ण होत नाही
,

जिथे तुम्ही थोडे चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचे थांबवाला की तुम्ही मागे केलेली मदत ते विसरुन तेच लोक तुमची निंदा चालु करतात
,

त्याकरीता तुम्ही तुमचे कर्म करत चला , कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करु नका कारण कोणीच तुमच्याकडुन कायमस्वरुपी संतुष्ट होणार नाही.......

अर्थात जिवनात तुम्ही कितीही चांगले काम करा
लोक तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतात .............🍁🍁🍁🍁

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...