#डायरी
काही जणांना रोज डायरी लिहायची सवय असते ,, मला ही आहे पूर्वी नव्हती,,,मात्र काही कारणानिमित सुरु केली,,,15 वर्ष त्या डायरीत बंद आहेत,,,एक एक क्षण,,सर्व काही अगदी घटना आणि वेळेसकट!!
याचा फायदा होतो की तोटा माहित नाही हा मात्र हे खरं आहे की जेव्हा आपण डायरी लिहतो तेव्हा मन हलकं होत लिहून झाल्यावर मोकळं वाटत,,,,,!!
भरून आलेलं आभाळ अलगद हलकं होत,,,,!!
डायरी आपली मित्र असते ती सर्व शांतपणे ऐकून घेते,,,,उलट बोलत नाही की मधेच थांबवत हि नाही सखी असते आपण जसे आहोत तसे स्वीकारते,,,!
डायरी लिहतांना एकांतात आपले आपण आपणास गवसतो,,,!
खूप दुःख किंवा राग आल्यावर लिहल्यावर शांत वाटत जस नुकताच पाऊस पडून गेल्यावर वातावरण सुंदर होत ना अगदी तसंच,,,,!!
आणि कधी तरी एकटे असलो ना की मग आपलंच लिहलेले वाचतांना ते क्षण हुबेहूब नजरेसमोर येतात!!!!
खूप जवळची सखी असते डायरी पहा अनुभव घेऊन तुम्हीही!!!!
Comments
Post a Comment