Skip to main content

#एक विराट कोहली..

And Then…There Is Virat !!!!!

कुठलाही आवाज नाही..कुठेही माजी खेळाडूंचं बॅकिंग नाही...थोडासा जाड, थोडसं दिल्लीचं प्रत्येक वाक्याला भें - - - तोंडी असणारा...एक फ्लिक आणि एक कव्हर ड्राईव्ह, हे दोनच शॉट्स येतात असं वाटणारा....एक विराट कोहली नावाचा प्लेअर आला २००८ मध्ये...

त्याच्या डोळ्यात खुमखुमी आहे...रुबेल हुस्सेन ने त्याला बिट केल्यावर "क्या देख रहा हैं,जा बॉल डाल माँ - - - -" ही क्लिप यूट्यूबवर पाहिल्यावर ती दिसते...

एक स्पिरिट आहे...मी क्रीजवर असताना मीच त्या रिंगातला रिंगमास्टर असल्यासारखा त्याचा वावर आहे..."शाम तक खेलेंगे तो इनकी गां -  फट जायेगी" हा मुरली विजयला कॉन्फिडन्स देणारा त्याचा डायलॉग होता...ती टेस्ट मजबूतरित्या हरली साऊथ आफ्रिकेत आपण....तिसरी जिंकली..त्यामागे हाच कॉन्फिडन्स होता...

विव्ह रिचर्ड्सचा एक ऑरा होता...कॉलर वर करून, चेविंग गम चघळत तो यायचा...तसा आता कोहलीचा ऑरा झालाय...वेळप्रसंगी खाली मान घालून कमीपणा घ्यायची समज आहे...अँडरसनविरुद्ध आत्ता इंग्लंडमध्ये दाखवलेली....

लता मंगेशकरांची एकेक बेजोड गाणी आहेत...बच्चनचे तेवढेच सिनेमे...

कोहलीची शतकं तशीच होतायेत...अर्जुनाला दिसणाऱ्या माशाच्या एका डोळ्याच्य् एकाग्रतेची...

त्याचा फोकस,त्याची जिगीषु वृत्ती...रोज उठून तितक्याच जोमाने, त्या ऊर्जेने ग्राऊंडवर १००% देण्याची क्षमता...सगळंच अद्वितीय आहे...

तो अठरा वर्षांचा थोडासा जाड युवक आता चॅम्पिअन बनलाय...

वर्ल्ड कप नंतर त्याने सचिनला खांद्यांवर उचलला होता....खऱ्या अर्थाने खांदापालट तिथेच झाला म्हणायचा भारतीय बॅटिंगच्या नेतृत्वाचा...

एक सचिन पाहिला...आणि, आता कोहलीचं पूर्णत्व अनुभवलं...

त्याच्याइतकी जिद्द, पर्फेक्शनला रोज गवसा घालून तो बार उचलून परत उंच ढकलून त्याला उद्या परत गाठायची तडफ...आपल्यात १०% आली तर जन्म सफलच समजायचा...

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...