विश्वात दुःख मलाच नाहीत ?.
बहुतेक वेळेस आमची तक्रार असते " माझ्या वाट्याला एव्हडी दु:ख का ?.कुठे आहे देव ?.माझ्याशी अस का वागत असेल ?." अश्या एक ना अनेक तक्रारी असतात आमच्या . हे कुठ पर्यंत ,जो पर्यंत आम्ही प्रत्यक्ष आजूबाजूच्या समाजाच्या संपर्कात येत नाहीत.खूप वेळेस असं ही असते की माझ्या दु:खा पेक्षा समोरच्या व्यक्तिचे दु:ख खूप मोठी असतात . तरी सुध्दा ती व्यक्ति खूप स्थिर पाहायला मिळते .मग मला वाटायला लागते,मी जिवनातल्या कीती शुल्लक तक्रारी घेउन बसलोय आणि त्यांचा बाऊ करुन निराश होउन बसलोय.
असाच एक प्रसंग माझ्या मित्राच्या बहिणीचा .पतीचे निधन झाले.हे दु:ख तीच्या वाट्याला होतेच पण पती जिवंत असतांना त्यांच्या व्यसनाचा त्रास तीला होताच.सतत दारु पिलेली,गलिच्छ शिव्या ,मारझोड आणि घरातील सामानाची नासधूस .पती जिवित असतांना ही तीला सुख नव्हते .दारुचे व्यसन च तीच्या पतीचे निधनाचे कारण ठरले.दोन मुलांची जबाबदारी येउन पडली.मोठा मुलगा १४ व लहान १२ वर्षाचा होता.
पती वारल्यानंतर एखाद्या महिना झाला असेल कदाचित आणि मोठ्या मुलाला जोराची ताप थंडी भरुन आली.त्या मध्ये त्याच्या दोन्हीं किडनी निकामी झाल्या .जणू काही दु:खाचा डोंगर च हा.तीने ठरवल की मी माझी एक किडनी माझ्या मुला साठी देणार.पण तीचे इतर नातेवाईक बोलु लागले .तुझ्या मुलांची जबाबदारी तुझ्या वर आहे.आता काही तु किडनी देऊ नको.मुलं मोठी झाली का दे.तो पर्यंत दुसरे पर्याय वापरुन बघू .पुढे ८ वर्ष मुलाला डायलीसीस वर राहावे लागले.घरातील सर्व बघावे लागत होते, मुलाला आठवडाभरात २ वेळा डायलीसीस करावे लागत होते.
छोटा मुलगा २० वर्षाचा झाला आणि तीने किडनी मुलाला देण्याचा विचार केला. पण दुर्ददैव
तीला सुध्दा कर्करोगाने ग्रासले होते. नंतर मला मित्राला भेटता आले नाही पण काय झाले असेल ते चित्र डोळ्यापुढे येते.
असे प्रसंग आठवतात त्या वेळेस माझी दु:ख मला खूप छोटी वाटायला लागतात .लहान असतांना ऐकलेली गोष्ट आठवते.मुलगा जिवंत करा म्हणून एक स्त्री साधू कडे जाते.साधू तीला सांगतात, अश्या घरातून मुठभर धान्य घेऊन ये ज्या घरात कुणाचं कधी निधन झाले नाही.तीला असे घर मिळत नाही ज्या घरात कुणाचे निधन झाले नाही.
जगात सर्वांना सुख दुख आहे पण कुठेतरी संवाद कमी आहे.कुठेतरी संपर्क कमी आहे म्हणून मला माझे दु:ख मोठे आहे.
सुख पाहता जवा एव्हढं ।
दु:ख पाहता पर्वता एव्हढे ॥
Comments
Post a Comment