🤔 _*मुलांचा हट्टीपणा कसा कमी करायचा?*_
मुलांचा हट्टीपणा मोठी समस्या बनत चाललीय. जसं- जसं मूल मोठं होत तसं-तसा हट्टीपणा वाढत जातो, हा अनुभव आपण सर्वच घेत आहेत. अशात मूल कोणत्याही आज्ञेचे पालन करत नाहीत. यामुळे त्यांच्याबद्दल आपोआप तिटकारा निर्माण होतो. मात्र काही उपायांनी त्यांच्या वर्तनामध्ये बदल करता येतो. जाणून घ्या कसा? यावर एक नजर...
😴 _*पुरेशी झोप*_ : योग्य झोपेचा अभाव उतावीळपणा, राग प्रवृत्त करतो आणि त्यांच्यात हट्टीपणाची वृत्ती जोर धरते. यामुळे ठराविक तास झोप घेणे आवश्यक आहे. त्यांना सहज पचू शकेल असे अन्न दिले पाहिजे. काही वेळ त्यांना खेळण्यासही परवानगी द्या.
💁♂ _*इच्छा आणि गरजा समजून घ्या*_ : मुलांच्या सर्व इच्छा आणि गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यामध्ये हट्टीपणा निर्माण होतो. त्याचप्रमाणे या इच्छांकडे दुर्लक्ष केल्यानेही मुले हट्टी होतात. यामुळे त्यांच्या इच्छा समजून घेऊन त्यानुसार निर्णय घ्या.
👉 _*चौकशी कमी करा*_ : मुले शाळेतून घरी आल्यावर लगेच त्यांना घरच्या अभ्यासाबद्दल विचारणे योग्य नाही. जर तुम्ही असे केले तर त्यांना ते आवडणार नाही. यामुळे प्रथम त्यांना काही खाण्यासाठी द्या. मग, यानंतर शाळा आणि त्यांच्या मित्रांबद्दल थोडीशी चौकशी करा. यामुळे त्यांना आराम मिळाल्यासारखे वाटते. तसेच ताण कमी होण्यास मदत मिळते. मग, यानंतरच तुम्ही आरामात अभ्यासाचा विषय काढा.
🤝 _*त्यांना एकटं सोडू नका*_ : मुले एकटे राहिल्यास त्यांना समाजात कसे वागायचे? हे समजत नाही. तसेच अशा मुलांचा सामाजिक विकास हवा तसा होत नाही. यामुळे तुम्ही त्यांना समाजामध्ये मिसळण्यास सांगा. तसेच यासाठी प्रयत्न करा. मग त्यांना सोबत घेऊन फिरणं असेल, वेळ देणं असेल, कार्यक्रमात भाग घेणं आदी करा.
Comments
Post a Comment