------------------------सहजता----------------
या युगाला कोणी कलीयुग म्हणतात,कोणी विज्ञानयुग वा धकाधकीचे युग.माझ्यामते हा सर्व विचारांचा कल्लोळ आहे.हे मत म्हणजे असे आहे की,साप एखाद्यानेच पाहिला आणि इतरांनी त्यांच्या सांगण्यावरून अनुमान लावला आणि सुरु झाली ती निव्वळ अफवा.सापाची लांबी आणि जाडी कुणालाच निश्र्चित सांगता आली नाही,उरली फक्त चर्चा.तसंच काहीसं या युगा बाबत मत झाले आहे.कोणी म्हणते कलीयुग पण कली कोणालाही सापडला नाही आणि दिसलाही नाही.कोणी म्हणतात विज्ञान युग,विज्ञानात ना ऋची ना मनात कुतुहल फक्त चर्चा,तर कोणाच्या मते धावपळीचे किंवा धकाधकीचे जीवन तर ते थोडेफार दिसते शहरात बाकी सर्व आळस आणि आळसी समाज.मग तथ्य आहे कशात? फक्त चर्चेत.
अनेक थोर क्रांतिकारकांनी तुरुंगात असतानाही,परकीय सत्ता असतांनाही अनेक ग्रंथ,काव्य,साहीत्य लिहीलं आणि अभ्यासिले.त्यांना नाही अडथळा आला या वायफळ अफवेचा.मग आम्हीच का बाऊ करतो आहोत या गैरप्रचाराचा.
आपल्या देशात लोकांकडे जेवढा वेळ आहे आणि वाया जात आहे तेवढा खचितच इतरत्र देशात नसेल.
आपण युगाच्या नावे आणि अफवेपोटी आपली सहजता घालवून बसलो आहे.जी आमच्या सर्वांत निर्मात्याने सहज रुजवली आहे.सहजता म्हणजे ज्याअर्थी जन्म झाला त्याअर्थी आपल्या वाट्याला काही कर्म आणि कर्तव्य आलीच आहेत.ती कर्म आणि कर्तव्य वीणा अट वीणा बाधा आम्ही व्यक्त होऊ दिली पाहिजे.आम्ही पंचज्ञानेद्रीये,पंचकर्मेद्रीये आहेत असे मानतो तर त्याची सहजता वा वापर घालवून बसलो.कधी अनुभुती घेतच नाही परिणामी आम्ही सहजता घालविली.अंतेंद्रीय शक्तिचा विकास ठप्प झाली.परिणामी कुबड्यांचे आयुष्य जगतो आहोत.जीव आहे म्हणजे सर्व शक्ति आमच्यात निहीत आहेत पण विपुल मिळणारा सुविधांमुळे ऐतखाऊ झालो.स्वत:ला तर सोडा देवाला सुध्दा ओळख देईनासा झालो.
ज्ञान विज्ञानाचे आम्ही एवढे कौतुक करतो पण पुरृण वापर न करता फक्त धन्यता मानन्यातच सार्थकता समजतो.
सहजता ही अशी अवस्था आहे ज्यात निसर्गाच्या व्यक्त होण्याला आमचा प्रतिसाद मिळतो.अंतर्मनाला ऐकण्याची सवय लागते आणि दैवी आदेशाने जगण्याची ताकद येते.परिणामी आईला जशी बाळाची संपुर्ण काळजी असते तद्वत आम्हाला गरजेचे आणि आवश्यक तेच जीवनात लाभते आणि वृत्ती शांत होते.आनंदी जगण्याची वाट सापडते.आपण बघतो जास्तीतजास्त दु:के आमच्या पदरी पडतात ते आमच्या लुडबुड पणामुळे,हस्तक्षेपामुळे कारण नसताना तोंड खुपसल्यामुळे,अथवा अधिकार नसताना भाष्य केल्याने.असे विकत घेतलेले जीवन सतयुगात देखील शांतता प्रदान करणार नाही.
या युगाला अथवा काळाला नावे ठेवणे म्हणजे,जखम आमच्या हाताला आहे आणि राग माश्यांवर काढून उपयोग नाही.
तेव्हा ती निरागस सहजता अनुभवा.अंतर्मनाचं ऐका वीणा हस्तक्षेप जगा.आपल्याच शक्तिचा वापर करा.परावलंबित्व टाळा.गंज चढण्या आधीच जीवनाचा आनंद लुटा.
जीवन हे जगण्यानेच आनंदी होईल.बाहेरचे उपाय उपचार खर्च वाढवतील आणि वय घटवतील.त्या नादात आयुष्य कधी निसटुन जाईल कळणार देखील नाही.
ही शक्ति सर्वात विद्यमान आहे.
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment