Skip to main content

#लव्ह असो वा अरेंज.....

हे खरंय का ?
कुणी कुणी अनुभव घेतला आहे?

बरेचदा लग्नाआधी जोडीदारांपैकी एक जण लग्न व्हावे म्हणून काहीतरी खोटं बोलतोच, प्रत्येकाचं एक रहस्य असतं
शिक्षण, आवड- निवड, आर्थिक परिस्थिती ,कर्ज, शाररिक व्यंग आजार , प्रेमप्रकरण, इतर कडू अनुभव किंवा पत्रिकेतील दोष यापैकी एक किंवा अजूनही बरेंच काही मुद्दे असतील.

नेहमी खरे बोलावे हा सुविचार छान आहे, पण सध्या लग्न जुळणे इतके अवघड झाले आहे की 'कणकेत जसं मीठ चालतं ,तसं लग्न जुळवताना थोडी लपछापवी चालते, अशी म्हण ऐकू येते.
फसवणूक करण्याचा उद्देश नसतो,पण बोलावं लागतं म्हणे .
नेहमीच वाईट हेतूने नाही. कधी कधी नाईलाज असतो.
समोरच्या व्यक्तीच फार मोठं नुकसान होणार नसेल तर काय हरकत आहे? असं सांगितलं जातं.
खरंच शक्य आहे का लग्नाआधी दोघांनी 100% खरं  बोलणं?
एकमेकांना सगळ्या गुण सर्व दोषांसह स्वीकारणं?
लपवलेली बाब छोटी का मोठी हे कोण ठरवतं?

पुढील आयुष्यात एकमेकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी विश्वास निर्माण होण्यासाठी हा खरेपणा आवश्यक असतो ना.
आपल्याकडे अरेंज मॅरेज मध्ये दोघांना मोकळेपणाने भेटू -बोलू देणं इतकं चुकीचं का मानतात?
लव्ह मॅरेज मध्येही खोटं आहेच. कुणीतरी काहीतरी लपवतातंच,पण प्रेम आंधळं असतं अस लाडाने म्हणतो.

लव्ह असो वा अरेंज डोळसपणे झालं तर चांगलं आहे ना ?
काही गोष्टी लग्नानंतर समजणं योग्य की अयोग्य ?

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...