Skip to main content

कर्म म्हणजे काय ?*

*कर्म म्हणजे काय ?*

एकदा एक राजा हत्तीवर बसुन आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता.
फिरतफिरत तो एका गावातील दुकानासमोर थांबला.

प्रधानाला बोलाऊन म्हणाला, का कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहीले नाही, त्याला ओळखतपण नाही,पण मला या दुकानदाराला फाशी द्यावीशी वाटते आहे.

प्रधान बुचकळ्यात पडला तो काही बोलण्याच्या अगोदरच राजा तेथून पुढे निघाला.
प्रधान विचारात पडला. त्यान तेे दुकान पाहून ठेवले व तो राजामागे निघाला.🚶🏼‍♂🚶🏼‍♂🚶🏼‍♂🚶🏼‍♂

दुस-या दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानाशी साध्या वेशात पोहोचला. दुकानात दुकानदारा शिवाय कोणीच नव्हते.
आजुबाजुला चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले.

तो दुकानात गेला. त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने मालक वैतागला होता.

_चौकशी करता कळले की लोक नुसते येतात वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात._

रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला ब-याचवेळा वाटे की, *किमान राजा तरी मरावा*. तो मेला तर त्या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्य संस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल. माल विकला जाईल. चार पैसे तरी मिळतील.

_प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापा-याला फाशी का द्यावे वाटले याचा उलगडा झाला._

व्यापा-याच्या मनातील राजाविषयीच्या वाईट विचारांच्या तरंगलहरीनी दुषीत वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उद्भवले होते.

त्याने त्या दुकानदाराकडे थोडी चंदन खरेदी केली. दुकानदाराला ब-याच दिवसांनी गि-हाईक मिळाल्याने आनंद झाला.

*प्रधान निघाला* आणि राज दरबारात राजापुढे ते चंदन ठेवले.

राजाने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने मोहित झाला.

त्याने प्रधानाला विचारले कोठून आणले हे चंदन ? प्रधानाने त्या व्यापा-याचे नांव सांगितले.
राजा म्हणाला, अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले ! त्या व्यापा-याला *कांही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला.*

राजा अध्ये मध्ये इतरांना *अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करु लागला.*  राजाच्या खरेदीने आनंदित व्यापा-याच्यामनात आता *राजा मरावा* हे येईनासे झाले.

चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून राजाचा तो मित्र झाला.

...id *मतीत अर्थ* id.......

_*आपल्या मनात इतरां विषयी चांगले विचार, दयाळुपणा आणला तर इतरांच्या मनातुनही चांगले* विचार चांगल्या भावना आपल्यापर्यन्त येतील._*
व आपला उत्कर्ष होईल.*

मग कर्म म्हणजे काय ? अनेकजण म्हणाले, आपले शब्द, आपली कृती, आपली भावना...

*पण खरे हेच आहे की, आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म होय !!!*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपले नम्रः
*शिवजन्मभुमी युवा फाउंडेशन

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...